महाराष्ट्राचे पहिले पेशवा बाजीराव पहिले हे छत्रपती शाहू महाराजांचे पंतप्रधान होते. बाजीराव पेशवे यांनी १० जानेवारी १७३० साली शनिवारच्या दिवशी आपल्या स्वतःच्या वाड्याची पायाभरणी केली. आपल्या या वाड्याला त्यांनी शनिवार वाडा (Shaniwar Wada) असं नाव दिलं. हा वाडा उभारण्यासाठी वापरण्यात आलेली सागाची लाकडं जुन्नरच्या जंगलातून आणली गेली होती. तसंच चिंचवडच्या जवळच्या खाणीतून वाडा बांधण्यासाठी दगड आणले गेली आणि जेजुरीच्या चुना-पट्ट्यातून चुना आणला गेला होता. १७३२ साली शनिवारवाड्याचं बांधकाम पूर्ण झालं होतं. हा वाडा उभारण्यासाठी एकूण रु. १६,११० एवढा खर्च आला होता. त्याकाळी ही खूप मोठी रक्कम होती.
(हेही वाचा- Wayanad Landslide : वायनाडच्या बचावकार्यात ‘या’ मराठमोळ्या महिला अधिकाऱ्याचे मोलाचे योगदान)
शनिवार वाड्याचा (Shaniwar Wada) उद्घाटन समारंभ २२ जानेवारी १७३२ साली परंपरागत चालत आलेल्या धार्मिक रितींप्रमाणे पार पडला. त्यादिवशीही शनिवारच होता.
त्यानंतर पुढे पेशव्यांनी या शनिवारवाड्याला (Shaniwar Wada) तटबंदीच्या भिंती, बुरुज आणि दरवाजे यांसारखं आणखी बांधकाम करून घेतलं. जसं की, कोर्ट हॉल आणि इतर इमारती, कारंजे आणि जलाशय, तटबंदीच्या परिघाला पाच प्रवेशद्वारं आणि नऊ बुरुज यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त वाड्याच्या मूळ इमारतीसोबतच मोठं उद्यानंही आहे. शनिवार वाडा कसबा पेठेमध्ये मुळा-मुठा नदीजवळ दिमाखाने वसलेला आहे.
(हेही वाचा- Mukhyamantri Ladki Bahin Yojana : अर्जांची छाननी करण्याचे आव्हान; प्रतितास ४० अर्जांची छाननी करण्याचे आदेश)
◆शनिवार वाड्याचे पाच दरवाजे
●दिल्ली दरवाजा
दिल्ली दरवाजा हा शनिवार वाड्याच्या (Shaniwar Wada) इमारतीचा मुख्य दरवाजा आहे. त्या दरवाज्याचं तोंड उत्तरेकडे म्हणजेच दिल्लीकडे आहे. शनिवार वाडा हा भारतातला एकमेव किल्ला आहे, ज्याचा मुख्य दरवाजा मुघल साम्राज्याची मध्ययुगीन शाही राजधानी असलेल्या दिल्ली शहाराकडे आहे. छत्रपती पहिले शाहू महाराजांनीही या उत्तराभिमुख असलेल्या किल्ल्याला बाजीराव पेशव्यांच्या मुघल साम्राज्याविरुद्ध असलेल्या महत्त्वाकांक्षेचं प्रतिक मानलं होतं. शनिवार वाड्याच्या भक्कमपणे उभारलेल्या दिल्ली दरवाज्याच्या मुख्य तटबंदीला भव्य दरवाजे आहेत. हे दरवाजे हौदा म्हणजेच छत असलेले आसन बांधलेल्या हत्तींनाही सहज प्रवेश करता येईल इतके मोठे आहेत.
(हेही वाचा- Intelligence firm च्या सर्वेक्षणात PM Modi हे जगातील सर्वात लोकप्रिय नेते)
वाड्याच्या सुरक्षिततेसाठी चारही बाजूने युद्धासाठी तयार असलेले हत्ती आणि सैनिक यांचा रात्रंदिवस खडा पहारा ठेवला जायचा. एवढंच नाही तर युद्धासाठी लागणारी शस्त्रास्त्रेसुद्धा साठवण्याची सोय या तटबंदीवर केलेली होती. (Shaniwar Wada)
भव्य मोठ्या दिल्ली दरवाज्याच्या उजव्या भागात सहज आत-बाहेर करण्यासाठी एक लहान दरवाजा केलेला आहे. शनिवार वाडा (Shaniwar Wada) ही वास्तू राजस्थानातल्या वडार नावाच्या उपजातीतल्या ‘कुमावत’ नावाच्या एका ठेकेदाराने बांधली होती. वाड्याचं बांधकाम पूर्ण झाल्यानंतर बाजीराव पेशव्यांनी त्या ठेकेदाराला ‘नाईक’ हे नाव दिलं होतं.
(हेही वाचा- PFI शी संबंधित मौलवीने हिंदु मुलीचे केले धर्मांतर; १० जणांच्या विरोधात गुन्हा नोंद)
●मस्तानी दरवाजा
हा दरवाजा उत्तराभिमुख आणि मस्तानीच्या वाड्याकडे जाणारा होता. म्हणून त्याला मस्तानी दरवाजा असं नाव दिलं होतं. (Shaniwar Wada)
●खिडकी दरवाजा
खिडकी दरवाजा हे नाव दरवाज्याला असलेल्या चिलखती खिडकीवरुन ठेवण्यात आले आहे. हा दरवाजा पूर्वाभिमुख आहे. (Shaniwar Wada)
(हेही वाचा- Accident News : उत्तरप्रदेशातील लखनऊ-आग्रा एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात, 7 ठार 40 जखमी)
●गणेश दरवाजा
या दरवाजाचे तोंड आग्नेय दिशेला आहे. या दरवाज्याजवळ असलेल्या गणेश रंगमहालाचे नाव आहे. जवळच्याच कसबा गणपती मंदिराला भेट देण्यासाठी गडावरच्या स्त्रिया या दरवाज्याचा वापर करत असत. (Shaniwar Wada)
●जांभूळ दरवाजा किंवा नारायण दरवाजा
हा दरवाजा दक्षिणाभिमुख आहे. या दरवाजाचा उपयोग उपपत्नी किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी आणि बाहेर पडण्यासाठी करत असत. (Shaniwar Wada)
(हेही वाचा- गरज नसेल, तर Lebanon ला जाऊ नका; भारत सरकारचे आवाहन)
नारायणराव पेशवे यांचा मृतदेह याच दरवाज्याने अंत्यसंस्कारासाठी किल्ल्यावरून काढल्यानंतर या दरवाज्याला दुसरं नाव दिलं गेलं. असं म्हटलं जातं की, या दरवाज्यावरच त्यांची हत्या करण्यात आली होती. (Shaniwar Wada)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community