बराक ओबामांचे निकटवर्तीय व्यावसायिक अधिकारी Shantanu Narayan

Shantanu Narayan : शांतनू नारायण १९९८ मध्ये Adobe मध्ये जागतिक उत्पादन विकासाचे वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून सामील झाले. २००१ ते २००५ पर्यंत ते वर्ल्डवाईड प्रोडक्ट्सचे कार्यकारी उपाध्यक्ष होते.

140
बराक ओबामांचे निकटवर्तीय व्यावसायिक अधिकारी Shantanu Narayan
बराक ओबामांचे निकटवर्तीय व्यावसायिक अधिकारी Shantanu Narayan

शंतनू नारायण (Shantanu Narayan) हे भारतीय वंशाचे व्यावसायिक अधिकारी आहेत. ते डिसेंबर २००७ पासून Adobe Inc. चे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आहेत. त्यांचा जन्म २७ मे १९६३ रोजी हैदराबाद येथे झाला. त्यांनी हैदराबादमधील उस्मानिया विद्यापीठाच्या युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमधून इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनीअरिंगमध्ये बॅचलर डिग्री मिळवली आहे. (Shantanu Narayan)

(हेही वाचा- Veer Savarkar : घरातून पाठिंबा मिळत असल्याने माझे हिंदुत्व अजुनही टिकून; विद्याधर नारगोळकर यांनी व्यक्त केली कृतज्ञता)

त्यानंतर पुढचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी ते युनायटेड स्टेट्समध्ये गेले आणि १९८६ मध्ये ओहियोमधील बॉलिंग ग्रीन स्टेट युनिव्हर्सिटीमधून संगणक शास्त्रात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. पुढे त्यांनी हास स्कूल ऑफ बिझनेस, कॅलिफोर्निया विद्यापीठ, बर्कले येथून एमबीए केले. १९८६ मध्ये ते मेजरेक्स ऑटोमेशन सिस्टीम्स नावाच्या सिलिकॉन व्हॅली स्टार्ट-अप मध्ये सामील झाले. त्यानंतर ते ऍपलमध्ये गेले. इथे ते १९८९ ते १९९५ दरम्यान वरिष्ठ व्यवस्थापकीय पदांवर कार्यरत होते. (Shantanu Narayan)

शांतनू नारायण (Shantanu Narayan) १९९८ मध्ये Adobe मध्ये जागतिक उत्पादन विकासाचे वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून सामील झाले. २००१ ते २००५ पर्यंत ते वर्ल्डवाईड प्रोडक्ट्सचे कार्यकारी उपाध्यक्ष होते. २०११ मध्ये, बराक ओबामा यांनी त्यांना त्यांच्या व्यवस्थापन सल्लागार मंडळाचे सदस्य म्हणून नियुक्त केले. नारायण हे Pfizer च्या संचालक मंडळाचे प्रमुख स्वतंत्र संचालक आणि US-India स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरमचे उपाध्यक्ष आहेत. (Shantanu Narayan)

(हेही वाचा- Veer Savarkar : ‘सावरकर पुरस्काराने माझ्यावरील जबाबदारी वाढली’ – डॉ. सुहास जोशी)

२०११ मध्ये, नारायण (Shantanu Narayan) यांना बॉलिंग ग्रीन स्टेट युनिव्हर्सिटीकडून मानद डॉक्टरेट मिळाली. २०१८ मध्ये, त्यांना फॉर्च्युनच्या “बिजनेस पर्सन ऑफ द इयर” यादीत १२ व्या क्रमांकावर स्थान प्राप्त झाले आणि द इकॉनॉमिक टाइम्स ऑफ इंडियाने २०१८ मध्ये “ग्लोबल इंडियन ऑफ द इयर” म्हणून गौरवले होते. विशेष म्हणजे त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीसाठी त्यांना २०१९ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले. (Shantanu Narayan)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.