Sharad Joshi : साहित्यिक आणि सिने लेखक शरद जोशी

शरद जोशी यांचा जन्म २१ मे १९३१ रोजी उज्जैन, मध्य प्रदेश येथे झाला.

210
Sharad Joshi : साहित्यिक आणि सिने लेखक शरद जोशी
Sharad Joshi : साहित्यिक आणि सिने लेखक शरद जोशी

शरद जोशी (Sharad Joshi) हे भारतीय कवी, लेखक, विनोदी-लेखक आणि हिंदी चित्रपट आणि टेलिव्हिजनमधील संवाद आणि पटकथा लेखक होते. १९९० मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शरद जोशी (Sharad Joshi) यांचा जन्म २१ मे १९३१ रोजी उज्जैन, मध्य प्रदेश येथे झाला. त्यांनी काही काळ सरकारी नोकरी केली, त्यानंतर त्यांनी लेखन हे आपला उदरनिर्वाहाचे साधन म्हणून स्वीकारला.

सुरुवातीला त्यांनी काही कथा लिहिल्या, नंतर त्यांनी पूर्णपणे विनोदी-लेखन करायला सुरुवात केली. उपहासात्मक लेख, उपहासात्मक कादंबऱ्या, व्यंगात्मक स्तंभ याशिवाय त्यांनी विनोदी मालिकांसाठी पटकथा आणि संवादही लिहिले आहेत. शरद जोशी (Sharad Joshi) हे हिंदी व्यंग-लेखनाला प्रतिष्ठा मिळवून देणाऱ्या प्रमुख लेखकांपैकी एक आहेत. समाजातील सर्व विसंगतींचे स्पष्ट चित्रण त्यांच्या कलाकृतींमध्ये दिसून येते.

(हेही वाचा – HSC Result: विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली! बारावीचा निकाल जाहीर होणार)

परिक्रमा, किसी बहाने, जीप पर सवार इल्लियाँ, रहा किनारे बैठ, दूसरी सतह, प्रतिदिन(३ खंड), यथासंभव, यथासमय, यत्र-तत्र-सर्वत्र, नावक के तीर, मुद्रिका रहस्य, हम भ्रष्टन के भ्रष्ट हमारे, झरता नीम शाश्वत थीम, जादू की सरकार, पिछले दिनों, राग भोपाली, नदी में खड़ा कवि, घाव करे गंभीर, मेरी श्रेष्ठ व्यंग रचनाएँ असे गद्य लेखन त्यांनी केले आहे.

१९५० मध्ये, जेव्हा शरद जोशी (Sharad Joshi) इंदूरमध्ये वृत्तपत्रे आणि रेडिओसाठी लिहीत होते, तेव्हा त्यांची ओळख इरफाना सिद्दीकी यांच्याशी झाली आणि ही ओळख प्रेमांत रुपांतरित होऊन त्यांनी विवाह केला. ती भोपाळमधील लेखिका, रेडिओ कलाकार आणि थिएटर अभिनेत्री होती. या जोडप्याला बानी, रिचा आणि नेहा शरद या तीन मुली झाल्या. नेहा शरद एक अभिनेत्री आणि कवयित्री आहे.

(हेही वाचा – Pune Accident: फरार बिल्डर विशाल अग्रवाल अखेर पोलिसांच्या ताब्यात!)

क्षितिज, गोधूलि, उत्सव, उड़ान, चोरनी, साँच को आँच नहीं, दिल है कि मानता नहीं या चित्रपटांसाठी शरद जोशी (Sharad Joshi) यांनी संवाद लिहिले आहेत. यह जो है जिंदगी, मालगुड़ी डेज, विक्रम और बेताल, सिंहासन बत्तीसी, वाह जनाब, दाने अनार के, यह दुनिया गज़ब की, लापतागंज या मालिकांचे लेखनही त्यांनी केले आहे. त्यांच्या काळातील ते एक यशस्वी लेखक होते.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.