सावरकरांच्या विचारांमुळे हिंदू राष्ट्र निर्माण होण्याची काँग्रेसला भीती- शरद पोंक्षे

स्वातंत्र्यवीर सावरकरांवर काँग्रेसकडून सातत्याने आरोप करण्यात येत आहेत. अंतिम जन या नियतकालिकात स्तुती करण्यात आल्यामुळे पुन्हा एकदा सावरकरांवर टीका होत आहेत. पण याचबाबत आता सावरकर अभ्यासक आणि शिवसेनेचे उपनेते शरद पोंक्षे यांनी हिंदुस्थान पोस्टला दिलेल्या मुलाखतीत काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

म्हणून पोटदुखी सुरू झाली

सावरकरांमुळे गांधींचं महत्व कमी होण्याची काँग्रेसला भीती आहेच. पण अहिंदूंना खूश ठेवण्यात धन्यता मानणा-या काँग्रेसला देशात हिंदू राष्ट्र येईल याची देखील भीती वाटत आहे. अहिंदुंना खूश ठेवणं हा काँग्रेसच्या घाणेरड्या राजकारणाचा एक भाग आहे. मतपेट्या भरण्यासाठी लांगुलचालन करतच काँग्रेसने स्वातंत्र्यानंतर देशात राज्य केलं. पण त्यानंतर काँग्रेसेतर हिंदुत्ववादी विचारांचं राज्य देशात आल्यामुळे काँग्रेसची ही पोटदुखी सुरू झाली आहे, असे म्हणत शरद पोंक्षे यांनी सावरकरांवर टीका करणा-या काँग्रेसवर घणाघात केला आहे.

(हेही वाचाः गांधी मेमोरियललाही मानावं लागलं सावरकरांचेच विचार गांधींपेक्षा श्रेष्ठ)

म्हणून हिंदू राष्ट्राचा पुरस्कार

सावरकरांनी कधीही तात्कालीन स्वार्थासाठी आपलं हिंदुत्व सोडलं नाही. हिंदू हा एकमेव धर्म असा आहे जो संपूर्ण विश्वाला आपल्या कवेत घेऊन सुखाने आणि शांततेने नांदणारा धर्म आहे. त्यामुळेच सावरकरांनी कायम हिंदू राष्ट्राचा पुरस्कार केला. पण त्यामुळेच काँग्रेसकडून त्यांच्यावार वारंवार टीका होत असल्याचे पोंक्षे यांनी म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here