सुप्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे यांचे व्याख्यान शुक्रवार, १४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ८ वाजता नवी मुंबई येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात आयोजित करण्यात आले आहे. ‘आधुनिक हिंदुत्वाचे पुरस्कर्ते स्वातंत्र्यवीर सावरकर’ या विषयावर शरद पोंक्षे बोलणार आहेत. कार्यक्रमाचे आयोजन ‘सावरकर विचार मंच, नवी मुंबई’ यांच्या वतीने करण्यात आले आहे.
‘शतजन्म शोधिताना’ हा कार्यक्रमही होणार
या कार्यक्रमात बौलताना विसाव्या शतकात बदलत्या राजकीय आणि भौगोलिक पार्श्वभूमीवर नवा हिंदुत्व सिद्धांत यावर शरद पोंक्षे सविस्तर विचार मांडतील. या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून आमदार गणेश नाईक, विहिंपचे क्षेत्रीय मंत्री शंकर गायकर, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे सह कार्यवाह स्वप्नील सावरकर, स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य अभ्यास मंडळाचे कार्यवाह उत्तम पवार आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन ‘सावरकर विचार मंच’चे अध्यक्ष संतोष कानडे यांनी केले आहे. हा कार्यक्रम विनामूल्य असला तरी कार्यक्रमासाठी प्रवेशिका आवश्यक आहेत. प्रवेशिकेसाठी ९९३०४१०००१ या क्रमांकावर संपर्क साधावा, किंवा पुढील लिंकवर जाऊन आपण नोंदणी करू शकता. https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSd7upggw9UrK4GBzkI3fvMARTX006wUdUoF0VYbelTaGzoPEA/viewform
याआधी सावरकर विचारांचा प्रसार करणारा ‘शतजन्म शोधिताना’ हा कार्यक्रम झाला, तसेच ‘साहसी सावरकर’ या विषयावर इतिहास अभ्यासक पार्थ बाविस्कर यांचे व्याख्यान झाले होते.
(हेही वाचा हलाल उत्पादनांवर आर्थिक बहिष्कार टाका; रणजित सावरकरांचे आवाहन)
Join Our WhatsApp Community