सावरकरांच्या देशप्रेमी विचारांचा धाक वाढला पाहिजे- शरद पोंक्षे

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवन कथेवर आधारित एका कार्यक्रमात सावरकर अभ्यासक अभिनेते शरद पोंक्षे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांचे महत्व सांगितले. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या देशप्रमी विचारांची दहशत वाढायला हवी, असे यावेळी पोंक्षे यांनी म्हटले आहे.

(हेही वाचाः नथुरामांनी केलेल्या गांधी हत्येमुळे सावरकर नावाच्या सूर्याला डाग पडला- शरद पोंक्षे)

सावरकरांइतका अपमान कोणाचाच झाला नाही

ज्यांचे स्वातंत्र्यवीर सावरकरांवर प्रेम आहे ते सावरकरांच्या विरोधात कोणी बोललं की त्यांना उत्तर देत नाहीत. इथे उत्तर देणारे कमी आणि आक्षेप घेणारे जास्त आहेत. इतक्या महान देशभक्ताचा जितका अपमान केला जातो तितका आजवर कोणाचाही झाला नसेल. त्यामुळे आता स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांची दहशत वाढली पाहिजे. सावरकरांची दहशत ब्रिटिशांना होती आता काँग्रेसलाही आहे. ही दहशत वाढली पाहिजे, असे विधान शरद पोंक्षे यांनी या कार्यक्रमात बोलताना केले आहे.

(हेही वाचाः राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल खरे ‘माफीवीर’! कारवाईला घाबरुन अनेकदा टेकले गुडघे)

राहुल गांधींवर टीका

लहान मुलांना स्वातंत्र्यवीर सावरकर समजतात पण त्या दिल्लीत बसलेल्या घोड्याला सावरकर कळत नाहीत, अशा शब्दांत शरद पोंक्षे यांनी राहुल गांधी यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली आहे. महाराष्ट्रात एकच नाही तर प्रत्येक गावात गोळवलकर विद्यालय असायला हवे, असे सावरकरांच्या विचारांवर आधारित कार्यक्रम तिथे व्हायला हवेत, असेही पोंक्षे यांनी यावेळी म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here