शरण राणी यांचा जन्म जुनी दिल्ली येथे झाला. त्यांचे कुटुंब सुशिक्षित व्यापारी होते. त्यांच्या कुटुंबाचा संगीत शिकण्यासाठी विरोध होता. शरण राणी (Sharan Rani) यांनी लहानपणापासूनच आपल्या कुटुंबाच्या विरोधात जाऊन अल्लाउद्दीन खान आणि त्यांचा मुलगा अली अकबर खान यांच्याकडे सरोद वाजवण्याचा रियाझ सुरू केला.
(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : तेलंगणात भाजपा-काँग्रेस आक्रमक, बीआरएसपुढे अस्तित्वाचा प्रश्न)
कुटुंबाचा प्रचंड विरोध डावलून घेतले संगीताचे शिक्षण
त्यांच्या संगीत शिकण्याला कुटुंबाचा प्रचंड विरोध होता. तो विरोध झुगारून शरण राणी यांनी आपल्या संगीतातल्या कारकिर्दीला सुरुवात केली. भारतीय इतिहासाच्या त्या काळात उच्चभ्रू आणि प्रतिष्ठित कुटुंबातील स्त्रियांना संगीत आणि नृत्यकला शिकण्याची परवानगी नसायची. फक्त संगीताचा वारसा असलेल्या मुली किंवा अशा स्त्रिया ज्या पुरुषांचं मनोरंजन करून पैसे कमावतात त्याच स्त्रिया संगीत आणि नृत्यकला शिकायच्या.
विविध गुरूंकडे घेतले नृत्यप्रशिक्षण
मात्र एवढा विरोध असतानाही शरण राणी यांनी अछान महाराज यांच्याकडे कथ्थक नृत्याचं प्रशिक्षण घेतलं. तसंच नभा कुमार सिन्हा यांच्याकडून त्यांनी मणिपुरी नृत्य शिकून घेतले. शरण राणी यांनी इंद्रप्रस्थ कॉलेज ऑफ वूमन येथून आपलं शिक्षण घेतलं. तर दिल्ली विद्यापीठातून एमए च शिक्षण घेतलं.
१९३० सालच्या उत्तरार्धापासून पुढे सात दशके शरण राणी यांनी अनेक मैफिलींमध्ये आपलं सरोदवादन आणि गायन सादर केलं आहे. एवढंच नाही तर युनेस्कोसाठी रेकॉर्डिंग करणाऱ्या फ्रांस, युनायटेड स्टेट्स आणि ब्रिटनमधल्या मोठमोठ्या कंपन्यांसोबत त्यांनी रेकॉर्डिंगसुद्धा केलं आहे. जवाहरलाल नेहरू हे शरण राणी यांना भारताच्या सांस्कृतिक राजदूत म्हणायचे. एवढंच नाही तर झाकीर हुसेन (Zakir Hussain) हे त्यांच्याबद्दल बोलताना म्हणाले होते की, शरण राणीने (Sharan Rani) संगीतात प्राविण्य मिळवले आहे. आता त्यांना संपूर्ण जगात प्रेम मिळेल.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community