अदानींचं रॉकेट सुसाट; Adani Enterpriseच्या शेअर्समध्ये १४ टक्क्यांची तेजी

112

अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी चांगली तेजी दिसून आली. गेले ९ दिवस सातत्याने मोठी घसरण झाल्यानंतर अदानी समूहाच्या शेअर्स दमदार तेजीत आहेत. बाजारात अदानी ग्रुपची प्रमुख कंपनी असलेल्या अदानी एंटरप्रायझेसचा शेअर १४ टक्क्यांनी मजबूत झाला आहे. तर अदानी पॉवर, अदानी विल्मर आणि एनडीटीव्हीच्या शेअर्सला अपर सर्किट आहे. अदानी टोटल गॅस वगळता सर्व समुहाचे शेअर्स हिरव्या निशाणासह व्यवहार करीत होते.

सततच्या घसरणीतनंतर समुहाच्या कंपन्यांचे बाजार भांडवल निम्म्यावर आले होते. त्यानंतर, गुंतवणूकदारांचा विश्वास जिंकण्यासाठी, अदानी समूहाच्या प्रवर्तकांनी तारण ठेवलेल्या शेअर्सची पूर्तता करण्यासाठी वेळेपूर्वी ११० दशलक्ष डॉलरपेक्षा जास्त परतफेड करण्याचा निर्णय घेतला. अदानी एंटरप्रायझेसच्या शेअर्समध्ये बुधवारी १४ टक्क्यांची वाढ होऊन तो २०५० रुपयांवर पोहोचला. मंगळवारी शेअर १८०३ रुपयांवर बंद झाला होता. गेल्या एक महिन्यात तो ४५ टक्क्यांहून अधिक घसरला असला तरी, शेअरसाठी एक वर्षाचा उच्चांक ४१९० रुपये आहे. अदानी पॉवर लिमिटेडचा शेअर बुधवारी सुमारे ५ टक्क्यांनी वधारून १८२ रुपयांवर पोहोचला आहे. मंगळवारी हा शेअर १७६ रुपयांवर बंद झाला होता. शेअर्सचा १ वर्षाचा उच्चांक ४३२ रुपये आहे.

(हेही वाचा – वीरेंद्र सेहवागचे अदानी समुहाला समर्थन; म्हणाला, गोऱ्यांना सहन होत नाही भारताची प्रगती)

अदानी ग्रीन एनर्जीमध्ये बुधवारी ३ टक्के वाढ झाली असून शेअर ८७० रुपयांवर पोहोचला आहे. मंगळवारी शेअर ८४५ रुपयांवर बंद झाला होता. शेअर्सचा एक वर्षाचा उच्चांक ३०५० रुपये आहे. अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोनचा शेअर बुधवारी ७ टक्के वधारला असून तो ५९२वर पोहोचला आहे. शेअरचा १ वर्षाचा उच्चांक ९८८ रुपये आहे. अदानी बिल्मर लिमिटेडच्या शेअरला बुधवारी ५ टक्के वरचे सर्किट आहे. तो ४१९ रुपयांपर्यंत वधारला. शेअरचा एक वर्षाचा उच्चांक ८७८ आहे. यासोबतच एनडीटीव्हीच्या शेअर्समध्ये बुधवारी ५ टक्क्यांचे अप्पर सर्किट लागले. तो २२८ रुपयांपर्यंत वधारला. शेअरचा एक वर्षाचा उच्चांक ५७३ आहे. दरम्यान, अदानी टोटल गॅसचा शेअर बुधवारी ५ टक्क्यांनी घसरून १३९१ रुपयांवर आला. एक महिन्यात शेअर सुमारे ६२ टक्क्यांनी घसरला आहे. तर शेअरचा एक वर्षाचा उच्चांक ४ हजार रुपये आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.