शर्मिला टागोर (Sharmila Tagore) एक सशक्त अभिनेत्री होत्या. सौंदर्य आणि अभिनय यांचा सुयोग्य मिलाफ म्हणजेच शर्मिला टागोर. त्यांचे कुटुंब गुरुवर्य रवींद्रनाथ टागोर यांचे दूरचे नातेवाईक. फिल्ममेकर सत्यजित राय यांनी शर्मिला यांची प्रतिभा ओळखली आणि ’अपूर संसार’ मध्ये त्यांना काम करण्याची संधी दिली. त्यानंतर शर्मिला टागोर यांच्या अभिनयाचा आलेख वरवर चढत गेला.
शर्मिला टागोर यांचा जन्म ८ डिसेंबर १९४६ रोजी हैदराबाद येथे एका हिंदू बंगाली कुटुंबात झाला. त्यांचे वडील गीतेंद्रनाथ टागोर त्यावेळी ब्रिटिश इंडिया कॉर्पोरेशनचे जनरल मॅनेजर होते. शर्मिला यांचा विवाह १९६८ मध्ये भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार नवाब पतौडी यांच्याशी झाला होता. त्यांना सैफ अली खान, सबा अली खान आणि सोहा अली खान असी तीन मुलं आहेत.
(हेही वाचा-जैन विद्वान आणि तत्वज्ञ Sukhlal Sanghvi )
त्यांची अभिनयाची कारकीर्द नेहमीच यशस्वी ठरली आहे. त्यांच्या सुदैवाने हृषिकेश मुखर्जी, बासू भट्टाचार्य, शक्ती सामंत, गुलजार आणि यश चोप्रा यांसारख्या दिग्दर्शकांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी मिळाली. तसेच शम्मी कपूर, शशी कपूर, संजीव कुमार, धर्मेंद्र, राजेश खन्ना अशा दिग्गज कलाकारांसोबत काम करता आले. त्यांच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धमाका उडवून दिला.
‘अनुपमा’ आणि ‘सत्यकाम’ या चित्रपटांनीही शर्मिला (Sharmila Tagore) यांना शिखरावर नेऊन ठेवले. धर्मेंद्र आणि हृषिकेश मुखर्जी यांच्यासोबत शर्मिला टागोर यांनी या दोन चित्रपटांमध्ये काम केले आणि त्यांचा गंभीर अभिनय देखील प्रेक्षकांना रुचला. ऋषीदा यांचा विनोदी चित्रपट ‘चुपके-चुपके’ हा शेक्सपियरच्या नाटकावर आधारित चित्रपट होता. चुपके-चुपकेमध्ये रोमॅंटिक-विनोदी भूमिका देखील त्यांनी सशक्तपणे साकारली.
त्यांचा आराधना चित्रपट प्रचंड लोकप्रिय ठरला. त्याचबरोबर अमर प्रेम, सफर या चित्रपटांमुळे त्यांना नवी ओळख मिळवून दिली. त्यांनी अभिनयासाठी अनेक पुरस्कार पटकावले. त्याचबरोबर भारत सरकारने २०१३ रोजी पद्म भुषण देऊन त्यांचा सन्मान केला. त्या CBFC म्हणजे फिल्म सेन्सॉर बोर्ड येथे अध्यक्ष देखील होत्या.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community