दहा दिवसांपूर्वी जन्मलेलं बाळ झालं पोरकं! महिला पोलिसाचा डेंग्यूने मृत्यू

पुणे जिल्ह्यातील बारामती शहर पोलीस ठाण्यातील महिला पोलीस कर्मचाऱ्याचा डेंग्यू आजाराने मृत्यू झाला. शीतल जगताप गलांडे असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून त्यांच्यावर पुणे शहरातील केईएम रूग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या निधनाने अवघ्या १० दिवसांपूर्वी जन्माला आलेले त्यांचे बाळ पोरकं झाले असल्याचे सांगितले जात आहे.

(हेही वाचा – मुंबई-अहमदाबाद महामार्गावर डिव्हायडर तोडून टेम्पोवर धडकली कार, तिघांचा जागीच मृत्यू)

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपूर्वी शीतल गलांडे या प्रसुती रजेवर गेल्या होत्या. प्रसुती झाल्यानंतर त्यांना डेंग्यूची लागण झाली. यानंतर उपचारांसाठी त्यांना केईएममध्ये दाखल करण्यात आले होते. परंतु उपचार सुरू असताना मंगळवारी पहाटे त्यांचे निधन झाले आहे. शीतल या शहर पोलीस ठाण्यातील संपूर्ण संगणकीय प्रणालीचे काम पाहत होत्या. गरोदरपणाच्या शेवटच्या दिवसापर्यंत त्या पोलीस ठाण्यात दैनंदिन कामकाज पाहत होत्या. त्यांच्या पश्चात त्यांचा पती, एक मुलगी आणि १० दिवसांपूर्वी जन्मलेले बाळ असा परिवार आहे.

दरम्यान, राज्यभरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक साथीचे रोग पसरल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच पुण्यात डेंग्यूच्या आजाराने थैमान घातले असून रूग्णांमध्ये वाढ होत आहे. या महिन्यातच पुणे शहराच्या हद्दीत डेंग्यूच्या ४१ रूग्णांची नोंद झाली आहे. तर ५०९ संशयित रूग्ण आढळून आले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here