शेर सिंह (Sheikh Maharaj Sher Singh) हे शीख साम्राज्याचे चौथे महाराजा होते. त्यांचा जन्म ४ डिसेंबर १८०७ रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव महाराजा रणजित सिंह होते आणि मातोश्रींचे नाव मेहताब कौर असे होते. १८ जानेवारी १८४० रोजी त्यांनी लाहोरवर चढाई केली आणि त्यांचा कारभार सुरू झाला. १८२० मध्ये महाराजा रणजित सिंह यांनी त्यांना दरबारात बसण्याचा विशेषाधिकार दिला आणि त्यांना नागरी आणि लष्करी सन्मान बहाल केला.
(हेही वाचा – Alandi : देवस्थानच्या विश्वस्त पदावरून स्थानिकांना डावल्याने आळंदी बंद)
१८३१ ते १८३४ पर्यंत त्यांनी (Sheikh Maharaj Sher Singh) काश्मीरचे राज्यपाल म्हणून काम केले आणि १८३४ मध्ये अफगाणांकडून पेशावर ताब्यात घेतलेल्या सैन्याचे ते कमांडर होते. १८३१ मध्ये शाह इस्माइल देहलवी आणि बरेलवी तर्फे शिखांविरुद्ध जिहाद जाहीर केला. ते बालाकोटमध्ये ठाण मांडून बसले. म्हणून प्रताप सिंह अत्तरवाला आणि अकाली हनुमान सिंह यांच्यासोबत शेर सिंह बालाकोट येथे आले.
(हेही वाचा – RC Majumdar : इतिहासकार आर सी मजुमदार)
त्यांनी (Sheikh Maharaj Sher Singh) बालाकोटला सर्व बाजूंनी घेराव घातला. शीखांनी या युद्धात प्रचंड पराक्रम गाजवला. सय्यिद अहमद खान याचा त्यांनी बंदिबस्त केला. त्याचबरोबर शाह इस्लाइम देहलवी याचा वध केला. मग शिखांनी सय्यिदची मालमत्ता आपल्या ताब्यात घेतली. अशाप्रकारे शिखांविरोधात जाहीर केलेला जिहाद महाराजा शेर सिंह यांनी थोपवून लावला.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community