Shikhar Savarkar Purskar : शिखर सावरकर पुरस्कार 2023च्या वितरण सोहळ्याची सचित्र झलक 

159
राजभवन येथील पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी उपस्थित असलेले (डावीकडून) स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे सदस्य कमलाकर गुरव, सदस्य सुहास नार्वेकर, सह कार्यवाह आणि 'हिंदुस्थान पोस्ट'चे संपादक स्वप्नील सावरकर, कोषाध्यक्ष मंजिरी मराठे, सदस्य के. सरस्वती, कार्यवाह राजेंद्र वराडकर, महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर, सदस्य नरेंद्र केणी, सदस्य संतोष कारकर, सदस्य देवेंद्र गंद्रे, सदस्य हेमंत तांबट, पोलीस अधिकारी तथा गिर्यारोहक राजू पाटील आणि कार्यक्रमाचे सूत्रसंचालक विनीत देव. 

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने देण्यात येणाऱ्या गिर्यारोहण क्षेत्रासाठीच्या शिखर सावरकर पुरस्कार २०२३ चे वितरण राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते शुक्रवार, १५ सप्टेंबर रोजी राजभवन येथे करण्यात आले. यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर आणि कोषाध्यक्ष मंजिरी मराठे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

गिर्यारोहणात राष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय कार्य करणा-या हरिश कपाडिया यांना यावेळी मानाचा शिखर सावरकर जीवन गौरव साहस पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर, गिर्यारोहणाच्या माध्यमातून दुर्गसंवर्धन आणि सामाजिक कार्यास मोठ्या प्रमाणात हातभार लावणा-या मुंबईच्या दुर्गवीर या संस्थेला उत्कृष्ट गिर्यारोहण संस्था पुरस्कार देण्यात आला. गिर्यारोहणात विशेषतः सह्याद्री विभागात विशेष प्राविण्य दाखविणा-या उदयोन्मुख युवा गिर्यारोहक पुरस्कार मुंबईच्या मोहन हुले यांना देण्यात आला.

(हेही वाचा Shikhar Savarkar Puraskar : स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकने भारतासाठी ऑलिम्पिक पदक जिंकावे – राज्यपाल रमेश बैस)

(हेही वाचा Shikhar Savarkar Purskar : राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते ‘शिखर सावरकर’ पुरस्कारांचे वितरण)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.