पोलिसांसाठी आनंदाची बातमी: ठाकरे सरकारने बंद केलेली ‘ही’ योजना शिंदे-फडणवीस सरकारने केली सुरु

156

शिंदे- फडणवीस सरकारने गणेशोत्सवानिमित्त महाराष्ट्र पोलिसांना मोठं गिफ्ट दिलं आहे. आता काॅन्स्टेबल रॅंकच्या कर्मचा-यांना खात्यांतर्गत 20 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळणार आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना ही माहिती दिली. यापूर्वी ठाकरे सरकारने DG लोन ही सुविधा बंद केली होती. ती आता फडणवीसांनी पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतला. यानिमित्ताने फडणवीसांनी ठाकरे सरकारचा आणखी एक निर्णय बदलला आहे.

DG लोन खात्यासाठी जेवढा निधी आवश्यक होता, तो निधी देण्यात आला आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. यानुसार, आता पोलिसांना 20 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज खात्यांतर्गतच मिळणार आहे. यापूर्वी शिंदे- फडणवीस सरकारने पोलिसांना 15 लाखांत घरे देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता ही कर्ज सुविधा सुरु केल्याने, पोलिसांना मोठा दिलासा मिळणार आहे.

( हेही वाचा: सीरम इन्सिट्यूटने तयार केली गर्भाशयाच्या कर्करोगावर पहिली स्वदेशी लस )

काय आहे DG Loan Scheme ?

DG लोन ही महाराष्ट्र पोलीस दलातील एक महत्त्वाची योजना मानली जाते. या योजनेनुसार, काॅन्स्टेबलपर्यंतच्या कर्मचा-यांना खात्यामार्फतच सहज लाखांपर्यंतचे कर्ज उपलब्ध केले जाते. संजय पांडे ज्यावेळी महाराष्ट्र सरकारचे अतिरिक्त पोलीस महासंचालक होते. त्यावेळी ठाकरे सरकारने ही योजना थांबवली होती. मात्र देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहमंत्र्यांचा कारभार आल्यानंतर त्यांनी या योजनेची पुन्हा माहिती घेऊन ती पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतला.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.