शेतक-यांचे आंदोलन स्थगित; सरकारने मान्य केल्या 70 टक्के मागण्या

शेतक-यांच्या 70 टक्के मागण्या झाल्याने किसान मोर्चा स्थगित करण्यात येत असल्याची घोषणा आमदार जे.पी. गावित यांनी केली आहे. शेतकरी वाशिंदमधल्या मैदानात ठाण मांडून होते. यावेळी आंदोलन शेतक-यांना भेटण्यासाठी जिल्हाधिकारी याठिकाणी दाखल झाले होते. त्यांनी शेतक-यांशी चर्चा केली. त्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

नाशिक जिल्ह्यातून 14 मार्च रोजी मुंबईच्या दिशेने निघालेला शेतकरी लाॅंग मार्च शहापूरजवळ पोहोचललेला असताना काही मागण्या मान्य झाल्यानंतर शेतक-यांनी आपले आंदोलन मागे घेण्याबाबत सकारात्मकता दाखवली होती. शुक्रवारी राज्य सरकारसोबत झालेल्या चर्चेनंतर शेतकरी आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. जर शेतक-यांबाबत जे निर्णय घेतले आहेत. त्याची अंमलबजावणी झाली नाही तर हा मोर्चा पुन्हा विधिमंडळावर धडकेल, असा इशारा देण्यात आला आहे.

( हेही वाचा: मुंबई- पुणे महामार्गावर भीषण अपघात; डिव्हाईडरचा राॅड कारच्या आरपार घुसला )

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here