जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती एनएचके वृत्तवाहिनीच्या हवाल्याने समोर आली आहे. त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांना नारा शहरात गोळ्या घालण्यात आल्या होत्या.
जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर एका भाषणादरम्यान पश्चिम जपानमधल्या नारा शहरामध्ये गोळीबार करण्यात आला. शिंजो आबे शुक्रवारी नारा येथील रस्त्यावर भाषण करत असताना, मागून एका व्यक्तीने हल्ला केला. पोलिसांनी या हल्लेखोराला ताब्यात घेतले आहे.
( हेही वाचा: ‘धनुष्यबाण’ कोणीही हिरावून घेऊ शकत नाही: उद्धव ठाकरे )
दोन हल्लेखोर अटकेत
जपानची वृत्तसंस्था द जपान टाईम्सच्या वृत्तानुसार, गोळीबारात शिंजो आबे यांना दोन गोळ्या लागल्या. त्यांना छातीत गोळी लागल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक होती. त्यानंतर त्यांनी उपचारादरम्यान रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. पोलिसांनी गोळीबार करणा-या दोन हल्लेखोरांना अटक केली आहे.
Join Our WhatsApp Community