एअर इंडीयामध्ये ३१ वर्षांपासून विमान वाहतूक सुरक्षा विषयक महत्त्वाची जबाबदारी पार पाडणारे शिरिन शरद पाठारे (Shreen Pathare) यांना ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटी (BCAS) कडून महासंचालक बीसीएएस कमेंडेशन डिस्क या राष्ट्रीय सर्टिफिकेशनने गौरवण्यात आले आहे. गुणवत्तापूर्ण सुरक्षा मानकांची अंमलबजावणी आणि सुरक्षा प्रशिक्षण कार्यातील गुणवत्तापूर्ण योगदान यासाठी पठारे यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. असा पुरस्कार मिळवणारे ते यावर्षीचे एकमेव मराठी अधिकारी आहेत. पाठारे हे मार्च २०२१ पासून श्रीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षा प्रमुख म्हणून जोखमीची जबाबदारी पार पाडत आहेत.
भारतीय सैन्य दलाप्रमाणेच देशाच्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या BCAS मध्ये शिरिन पाठारे हे गेली ३१ वर्ष जोखमीच्या जबाबदाऱ्या पार पाडत आहेत. BCASचे निरीक्षक आणि परीक्षक म्हणून कार्यरत असलेले पाठारे एक निष्णात एव्हिएशन सिक्युरिटी मॅनेजमेंट स्ट्रॅटेजिस्ट म्हणूनही सिव्हिल एव्हिएशन क्षेत्रात परिचित आहेत. श्रीनगरमध्ये महत्त्वाची जबाबदारी पार पाडत असतानाच ते तेथील ड्रॉपगेट या अतिसंवेदनशील गेटवर तैनात CRPF जवानांना प्रशिक्षण देण्याचे कामही करत आहेत.
हवाई वाहतूकीचा संबंध नागरी वाहतूकीशी येतो तसाच तो लष्करी वाहतूकीशी येतो. पाठारे यांनी काबुल, अफगाणिस्तान आणि श्रीनगर -J&K सारख्या जगातील अतिसंवेदनशील विमानतळांसह अनेक देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा व्यवस्थापनाच्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पूर्ण केल्या आहेत. विमान वाहतूकतील सुरक्षाविषयक संभाव्य धोके टाळण्यासाठी त्यांनी अनेक सुरक्षा ऑडीट्स, तपासण्या आणि जागरुकता कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
कार्गो आणि हाय प्रोफाईल व्हीआयपींच्या सुरक्षेवर देखरेख ठेवण्याचाही त्यांना दीर्घ अनुभव आहे. शिरीन पाठारे यांनी देशाच्या विमान वाहतूक सुरक्षा विषयक श्रेत्रात दिलेल्या योगदानामुळे हे क्षेत्र अधिक गुणवत्तापूर्ण आणि अत्याधुनिक होण्यास मदत झाली आहे.
(हेही वाचा : Supplementary Results 2023 : दहावी-बारावीच्या पुरवणी-परीक्षेचे निकाल जाहीर; लातूर विभाग प्रथम)
BCAS Officers and Officials आणि Other agencies officers and Officials
या दोन विभागात हे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. Disc आणि Certificate असे दोन पुरस्कार असतात. पाठारे यांना Other agencies officers and Officials मध्ये हा पुरस्कार मिळाला आहे. ते यातील एकमेव मराठी अधिकारी आहेत. (यात एकूण ५५ नावे आहेत. पैकी १५ Disc आणि ४० Certificate ) पाठारे यांना हा पुरस्कार नुकताच स्वातंत्र्यदिनी जाहीर करण्यात आला आहे. पुरस्कार वितरण सोहळा नंतर आयोजित करण्यात येणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community