Waqf Board सुधारणा विधेयकाला शिवसेना ठाकरे गटाचा विरोध; इंडी आघाडीची एकजूट

237
Waqf Board सुधारणा विधेयकाला शिवसेना ठाकरे गटाचा विरोध; इंडी आघाडीची एकजूट
Waqf Board सुधारणा विधेयकाला शिवसेना ठाकरे गटाचा विरोध; इंडी आघाडीची एकजूट
  • नवी दिल्ली प्रतिनिधी

आज दुपारी १२ वाजता संसदेत सादर होणाऱ्या वक्फ बोर्ड (Waqf Board) सुधारणा विधेयकाला शिवसेना ठाकरे गटाने विरोध करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून समोर आली आहे. ठाकरे गट सध्या इंडी आघाडीचा भाग असून, या आघाडीनेही विधेयकाला तीव्र विरोध दर्शवला आहे. यामुळे ठाकरे गटाने आपल्या मित्रपक्षांशी एकजूट दाखवत असल्याचे स्पष्ट होत आहे.

काल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी X वर ट्वीट करत उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) खोचक सवाल विचारला होता. “वक्फ सुधारणा विधेयक उद्या संसदेत येत आहे. शिवसेना ठाकरे गट बाळासाहेब ठाकरे यांचा विचार सोडून राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) तुष्टीकरणाच्या मार्गावर चालणार का?” असे फडणवीस (CM Devendra Fadnavis) म्हणाले. या ट्वीटमुळे ठाकरे गटाच्या भूमिकेवर चर्चा सुरू झाली होती. मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार, ठाकरे गटाने विधेयकाला विरोध करत इंडी आघाडीच्या बाजूने उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे.

(हेही वाचा – Ceasefire Violation : पाकिस्तानकडून LOC वर शस्त्रसंधीच उल्लंघन ; भारतीय सैन्याने दिलं सडेतोड प्रत्युत्तर)

राजकीय जाणकारांच्या मते, ठाकरे गटाचा हा विरोध मुस्लिम मतांच्या अपेक्षांना धरून असू शकतो. इंडी आघाडीतील पक्षांनी विधेयकाला मुस्लिम समाजाविरोधी ठरवत हितांचे रक्षण करण्याचा दावा केला आहे. वक्फ बोर्डात (Waqf Board) पारदर्शिता आणि महिलांचा सहभाग वाढवण्याचे प्रस्ताव असलेले हे विधेयक विरोधकांना मान्य नाही. आज सादरीकरणानंतर संसदेत तीव्र चर्चा अपेक्षित आहे. ठाकरे गटाच्या विरोधामुळे आघाडीतील एकजूट दिसून येत असली, तरी भाजपाकडून (BJP) यावर काय प्रतिक्रिया येते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.