राज्यातील गडकिल्ल्यांची दुरावस्था झाल्याने शिवप्रेमी आक्रमक झाले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करावे, या मागणीसाठी रविवारी मुंबईमध्ये आंदोलन सुरू आहे. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून या आंदोलनाला सुरूवात करण्यात आली. हे आंदोलक सीएसएमटीकडून मंत्रालयाकडे रवाना झाले. मात्र या आंदोलकांना रोखण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला. आज पहाटेपासून या आंदोलनासाठी राज्यभरातून शिवप्रेमी एकत्र जमा झाले. मंत्रालयाच्या दिशेने कूच करतांना पोलिसांनी आंदोलकांना अडवले.
(हेही वाचा – शिंदे-फडणवीस सरकारचा आणखी मोठा निर्णय! सचिवांना दिलेले अधिकार पुन्हा मंत्र्यांकडे)
राजकारणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेता तर मग तुम्हाला शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी वेगळं महामंडळ स्थापन करावेच लागेल, अशी मागणी शिवप्रेमींनी केली आहे. दरम्यान, आंदोलनकर्त्यांनी असाही सवाल केली की, मंत्र्यांच्या बंगल्यांना गडकिल्ल्यांची नावे दिले आहेत. पण संवर्धन जबाबदारीने का केले जात नाही. तुम्हाला जर संवर्धन करता येत नसेल तर मंत्र्यांच्या बंगल्याला ही नावं का दिली जातात, असेही त्यांनी म्हटले आहे.
पोलीस आंदोलकांना आझाद मैदान येथे आंदोलन करण्यास सांगत होते. मात्र त्यांच्यात मतभेद निर्माण झाल्याने मोर्चा आझाद मैदान समोरील रस्त्यावर मध्येच थांबला. यानंतर पोलिसांकडून मोठा फौडफाटा देखील मागवण्यात आला. या घटनेनंतर काही आंदोलकांना अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Join Our WhatsApp Community