पुन्हा एकदा शिवसेना विरुध्द शरद उघडे

119

मुंबई महापालिकेच्या जी दक्षिण विभागाचे सहायक आयुक्त शरद उघडे आणि शिवसेना नगरसेवकामध्ये शाब्दिक बाचाबाची होण्याचा प्रकार घडला आहे. शिवसेना नगरसेवक दत्ता नरवणकर यांनी उघडे यांच्यावर वैयक्तिक स्तरावर जावून आरोप केले. परंतु उघडे यांनीही आपल्या परिने त्यांना प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केल्याने यांच्यातील शाब्दिक बाचाबाचीची चर्चा, ‘जी दक्षिण’ विभागात चांगलीच ऐकायला मिळत आहे.

जी दक्षिण विभागाचे सहायक आयुक्त शरद उघडे हे विभागातील नगरसेवकांचे ऐकत नसल्याने यापूर्वी महापौरांसह शिवसेनेच्या नगरसेवकांनी महापालिका सभागृहाच्या बाहेरच ठिय्या मारला होता. प्रभाग समिती अध्यक्ष पदाच्या निवडणुकीला उघडे हे उशिरा पोहोचले. याचे कारण पुढे करत शिवसेनेच्या विभागातील सर्व नगरसेवकांनी उघडे यांच्यावरील राग व्यक्त करत त्यांच्या निषेध करण्यासाठी ठिय्या आंदोलन केले होते. मात्र, या आंदोलनानंतर शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांकडून पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी माफीनामा लिहून घेतला होता. त्यामुळे उघडे यांच्या विरोधात बोलण्याची हिंमत कोणताही शिवसेना नगरसेवक करत नव्हता.

( हेही वाचा : ‘त्या’ विश्वविक्रमी महापालिका कर्मचाऱ्यांचा आयुक्तांचा हस्ते सन्मान? महापौरांचे आयुक्तांना पत्र )

शाब्दिक चकमक

मंगळवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास शरद उघडे हे बाहेर जाण्यासाठी वाहनात बसत होते, तर त्याच दरम्यान शिवसेना नगरसवेक दत्ता नरवणकर हे तिथे पोहोचले. यावेळी नरवणकर यांनी तिखट शब्दात वैयक्तिक पातळीवर जावून त्यांचा समाचार घेतला. यावर उघडे यांचाही पार वाढला गेला आणि दोघांमध्ये शाब्दिक चकमक घडली. महापालिका जी दक्षिण विभागाच्या प्रांगणात हा प्रकार सर्वच कर्मचाऱ्यांच्या समक्ष हा प्रकार घडला. नरवणकर हे कुठल्या तरी वस्तीतील लोकांच्या घरांच्या पात्रतेच्या फाईलसंदर्भात पाठपुरावा करत आहे. परंतु कॉलनी अधिकारी सहायक आयुक्तांकडे ही फाईल असल्याचे सांगत आहेत. त्यामुळे अनेक दिवस झाले तरी यावर प्रशासनस्तरावर कोणताही घेतला जात नसल्याने नरवणकर यांचा पारा चढल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे यापूर्वी एकदा पक्षाच्या नेत्यांनी माफीनामा लिहून घेतल्यानंतरही नरवणकर यांनी ही हिंमत दाखवल्याने त्यांच्या हिंमतीची चर्चा विभागात ऐकायला मिळत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.