आता शिवसेनेचे शाखाप्रमुख घराघरात जाऊन ‘हे’ करणार काम!

मुख्यमंत्र्यांकडून ‘शिवसंपर्क’ मोहिमेची घोषणा करण्यात आली. 12 जुलैपासून राज्यभर ही मोहीम राबवली जाणार आहे.

शिवसेना…रस्त्यावर उतरून काम करणारा, अशी ओळख या पक्षाची आणि त्यांच्या शिवसैनिकांची आहे. मात्र आता याच आपल्या शिवसैनिकांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक महत्वाची जबाबदारी दिली आहे. राज्यात सध्या जोरात लसीकरण सुरू असून, शाखाप्रमुखांना प्रत्येक घराघरात जाऊन लोकांनी लस घेतली की नाही याची माहिती घेण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती मिळत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेनेच्या सर्व जिल्हा प्रमुखांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संपर्क साधला.


(हेही वाचा : नांदेडमध्ये लव्ह जिहाद! घरातील ७२ लाखांचे दागिने चोरून मुलीचा मुसलमानाबरोबर केला पोबारा!)

शिवसंपर्क मोहिमेची घोषणा

सगळ्यात महत्वाचे म्हणजे मुख्यमंत्र्यांकडून ‘शिवसंपर्क’ मोहिमेची घोषणा करण्यात आली. 12 जुलैपासून राज्यभर ही मोहीम राबवली जाणार आहे. सगळ्यात महत्वाचे राज्यात शिवसेनेची सत्ता असून, आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी शिवसेनेने कंबर कसली आहे. येत्या 12 ते 24 जुलैपर्यंत शिवसंपर्क मोहीम हाती घेण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या. या मोहिमेअंतर्गत “माझं गाव, कोरोना मुक्त गाव” करण्यासाठी शाखाप्रमुखांनी प्रत्येक घराघरात जाऊन लसीकरण झाले की नाही याची माहिती घ्यावी. इतर काही अडचणी आहेत का? विकासात्मक योजना त्यांच्यापर्यंत पोहचत आहेत की नाही, याचीही माहिती घ्या, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती मिळत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here