चीनला धक्का: भारत बनवणार मेड इन इंडिया iPhones !

Apple ही जगातील सर्वात मोठ्या टेक्नोलाॅजी कंपन्यांपैकी एक आहे. Apple कंपनी दरवर्षी हजारो आयफोन विकते आणि याचे बहुतांश उत्पादन चीनमध्ये होते. चीन आयफोनचा सर्वात मोठा निर्माता देश आहे. पण आता ही आकडेवारी वेगाने बदलू लागली आहे. नव्या रिपोर्टनुसार, 2027 पर्यंत जगभरातील एकूण विक्री होणा-या iPhone पैकी निम्मे आयफोन मेड इन इंडिया असतील. याआधीही यासंदर्भातील एक अहवाल समोर आला होता. ज्यात 2025 पर्यंत जगभरातील एकूण 25 टक्के आयफोन भारतात बनणार असल्याचा दावा करण्यात आला होता.

( हेही वाचा: एलाॅन मस्कच्या ऑफरचा तालिबानी घेताहेत फायदा; कट्टरपंथीयांचे ट्वीटर अकाऊंट व्हेरिफाईड )

चीनमधील कोरोना विस्फोटामुळे आयफोनच्या फॅक्ट्रीमधील उत्पादनावर त्याचा मोठा परिणाम होत आहे. प्रत्येक आठवड्याला कंपनीला अब्जावधी डाॅलरचे नुकसान होत आहे. त्यामुळेच कंपनीने आता चीनमधील आयफोनच्या बाबतीत असलेले अवलंबित्व कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या या निर्णयामुळे भारत आणि व्हिएतनाम या दोन देशांना याचा फायदा होणार आहे. भारत आयफोनच्या एकूण उत्पन्नाच्या निम्मे आयफोन मेड इन इंडियाद्वारे तयार करणार आहे. मागच्याच वर्षी भारतात iPhone 14 चे उत्पादन भारतात सुरु केले होते.

2027 पर्यंत जगातील प्रत्येक दुसरा आयफोन हा मेड इन इंडिया

एका रिपोर्टनुसार, भारतात सध्या 2.27 टक्के Apple कंपनीची सल्पायर फॅसिलीटी आहे. भारत आयफोन उत्पादनाच्या बाबतीत 8 व्या क्रमांकावर आहे. परंतु भारत लवकरच आघाडीवर जाण्याची शक्यता आहे. कारण 2027 पर्यंत जगातील प्रत्येक दुसरा आयफोन हा मेड इन इंडिया असेल.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here