टॅटू काढताय? सावधान! एकच सूई वापरल्याने १४ जणांना HIV चा संसर्ग

तुम्ही टॅटूची आवड असेल आणि तुम्ही देखील टॅटू काढण्यासाठी इच्छुक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. सध्या शरीरावर टॅटू काढण्याची क्रेझ तरूणांमध्ये पाहायला मिळत आहे. मात्र टॅटू काढणाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे काही जणांचे आयुष्य उद्धवस्त होण्याची वेळ आली आहे. टॅटू काढण्यासाठी एकाच सुईचा वापर केल्यामुळे उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्ये काही जणांना एचआयव्हीचा संसर्ग झाल्याचे समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

काय घडला प्रकार

टॅटू काढलेले १४ जण अचानक आजारी पडले. त्यांना ताप आल्याने त्याची टाईफॉईड आणि मलेरियाची तपासणी करण्यात आली. मात्र, त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही. ताप कमी होत नसल्यामुळे त्यांची एचआयव्ही चाचणी करण्यात आली. त्यातून सर्वांना एचआयव्हीचा संसर्ग झाल्याचे निदान करण्यात आले. त्यांची विचारपूस करण्यात आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

(हेही वाचा – Azadi Ka Amrit Mahotsav: खुशखबर! ताज महलसह ‘या’ ऐतिहासिक वास्तूमध्ये मिळणार FREE एन्ट्री!)

मिळालेल्या माहितीनुसार, सर्व रुग्णांनी अलीकडेच शरीरावर टॅटू काढला होता. धक्कादायक बाब म्हणजे टॅटू काढणाऱ्याने पैसे वाचविण्यासाठी एकाच सुईचा वापर केल्याचे सांगितले जात आहे. टॅटू काढण्यासाठी लागणारी सुई महाग असते. त्यामुळे अनेकजण एकाच सुईचा अनेकांवर वापर करतात. हा प्रकार अतिशय धोकादायक असल्याचे सांगितले जात आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here