धक्कादायक: पुण्यात स्टेशन परिसरात 7 वर्षीय मुलीचे अपहरण करुन लैंगिक शोषण

वडिलांचा जेवणाचा डबा देऊन परतणा-या एका मुलीवर अतिप्रसंग केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली . एका सात वर्षांच्या अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करण्यात आल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संपूर्ण पुणे या घटनेने हादरुन गेले आहे. पुणे रेल्वे स्थानक परिसरात घडलेल्या या घटनेने खळबळ माजली आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

पुणे स्थानक परिसरात सात वर्षांच्या चिमुकलीचे वडील चहा विक्रीचा स्टाॅल चालवतात. ही मुलगी वडिलांना जेवणाचा डबा द्यायला गेली होती. त्यावेळी डबा देऊन परतत असताना, एकाने मुलीला रेल्वे प्लॅटफाॅर्मवरील रुममध्ये नेले आणि तिथे तिचे लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस स्थानकात आलेल्या तक्रारीवरुन गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अज्ञात आरोपीविरोधात सध्या पोलिसांनी पाॅक्सो आणि विनयभंगांचा गुन्हा नोंदवला असून, पुढील तपास केला जात आहे. मात्र या घटनेमुळे राज्यातील मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

( हेही वाचा: सत्तेसाठी सोयीने राजकीय भूमिका बदलणारे नितीश कुमार-शरद पवार एकाच माळेचे मणी )

पोलीस आरोपींच्या शोधात 

पीडितेच्या तक्रारीवरुन आता पुण्यातील बंडगार्डन पोलीस स्थानकात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांकडून सध्या अज्ञात आरोपीविरोधात तपास केला जात आहे. पुणे रेल्वे स्थानकात असलेल्या सीसीटीव्हीचीही आता पडताळणी केली. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आणि स्थानिक खब-यांच्या साथीने आता आरोपीच्या मुसक्या आवळण्याचे काम पुणे पोलीस करत आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here