धक्कादायक! ST मधील घंटी वाजवायच्या दोरीने बस चालकाने घेतला गळफास!

एसची बसमध्ये असणाऱ्या घंटीच्या दोरीने एका बस चालकाने गळफास घेतला आणि आत्महत्या केली. या प्रकारानंतर एकच खळबळ उडाली आहे. धक्कादायक म्हणजे ही एसटी बस स्थानकात उभी असताना ही घटना घडली आहे. ही माहिती कळताच याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत लगेच घटनास्थळी दाखल होत बसमधील मृतदेह ताब्यात घेऊन अधिकचा तपास सुरू केला आहे.

काय घडला प्रकार

मिळालेल्या माहितीनुसार, धुळे बस स्थानकात एसटी बस चालकाच्या आत्महत्या केल्यानंतर स्थानक पूर्णतः हादरून गेले आहे. पुण्याच्या शिवाजीनगर बस स्थानकातील कार्यरत असणारे हिरामण देवरे यांनी बसमध्येच स्वतःचे जीवन संपवले. एसटी बसमधील घंटी वाजवण्याच्या दोरीने त्यांनी स्वतःला बसमध्येच गळफास लावून घेतला. यानंतर एसटी बस स्थानकात एकच खळबळ उजाली. पुणे-धुळे बसमध्ये ही धक्कादायक घटना उघडकीस आली.

(हेही वाचा – Indian Railway: हिवाळ्यात ट्रेनची AC बंद असते, तरीही रेल्वे त्यासाठी शुल्क आकारते! पण का…?)

बसमध्ये चालकाचा लटकलेल्या अवस्थेत मृतदेह दिसल्यानंतर लगेच याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवून पुढील कारवाई सुरू केली आहे. पुणे-धुळे बस चालकाने ही आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समोर आले नाही. मात्र हिरामण देवरे यांच्या आत्महत्येमुळे त्यांच्या कुटुंबीयांवर मोठा आघात झाला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here