हिंगोलीतील धक्कादायक घटना! आधी लग्नाचे आमिष नंतर अत्याचार; धर्मांतरासाठी तरुणीवर दबाव!

श्रद्धा हत्याकांड प्रकरणानंतर संपूर्ण देश हादरलेला असतानाच हिंगोलीमधून आणखी एक घटना समोर आली आहे. लिव्हईन रिलेशनशिपमध्ये असलेल्या तरूणीवर धर्मांतराचा दबाव टाकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. संबंधित तरुणीने धर्मांतर करण्यास विरोध केल्यानंतर तिला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी तक्रार केल्यावर पोलिसांनी आरोपी साजिद रफिकखॉं पठाण याला ताब्यात घेतले आहे.

( हेही वाचा : मेगाब्लॉकचे कारण चालणार नाही! परीक्षास्थळी वेळेतचं पोहोचा; MPSC ची विशेष सूचना)

धर्मांतरासाठी दबाव

आरोपी साजिद रफीकखॉं पठाण हा हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील जवळा पांचाळ येथील रहिवासी आहे. आरोपीने पीडित तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले. त्यानंतर या आरोपीने तरूणीवर डोंगरकडा, औरंगाबाद, फरीदाबाद, दिल्ली अशा विविध ठिकाणी अत्याचार केले. यानंतर या पीडित तरुणीवर धर्मांतरासाठी दबाव टाकण्यात आला आणि विरोध केल्यानंतर तिला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली.

आरोपी साजिद रफिकखॉं पठाणला अटक 

याप्रकरणी पीडित तरुणीने आरोपी विरोधात आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पीडितेच्या तक्रारीनंतर आरोपीला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here