शनिवारी सकाळी मुंबई बंदरातून गोवा येथे निघालेल्या कॉर्डएलिया क्रूझमध्ये ड्रग्स कसे पोहोचले असेल याबाबत अनेकांना प्रश्न पडला आहे. याचे उत्तर आता समोर येत असून त्यात धक्कादायक माहिती समोर येत आहे. drug महिला आणि पुरुषांचे कपडे, तसेच त्यांच्या बॅग्समध्ये हे ड्रग्स लपवून हे ड्रग्स क्रूझवर पोहोचवण्यात आले होते, अशी माहिती एका अधिका-याने दिली आहे.
(हेही वाचाः ड्रग्स भरून क्रूझ निघाली मुंबई टू गोवा, पण…)
अशी लढवली शक्कल
एनसीबीने क्रूझवर सुरू असलेल्या रेव्ह पार्टीत छापा टाकून मोठ्या प्रमाणात एमडी, कोकेन, हेरॉईन, चरस हे अंमली पदार्थ जप्त केले आहेत. क्रूझवर अंमली पदार्थ घेऊन येण्यास व त्यांचे सेवन करण्यास मनाई असून देखील दिल्लीतील आयोजकांनी या पार्टीत चोरुन ड्रग्स क्रूझवर आणले होते. यासाठी महिला आणि पुरुषांच्या अंगावरील कपडे इनरवेअर्सचा वापर केला गेला. पुरुषांच्या शर्टाचे कॉलर, पॅन्टची शिलाई काढून त्यात ड्रग्स लपवून पुन्हा शिलाई करुन ड्रग्स क्रूझवर आणले गेले होते.
(हेही वाचाः मुंबई टू गोवा ड्रग्स क्रूझः 8 जण ताब्यात! बड्या अभिनेत्याच्या मुलाची चौकशी, म्हणाला मी…)
8 जणांविरोधात गुन्हा दाखल
महिलांच्या हॅन्डबॅगचे हँडल इनरवेअर्सचा देखील ड्रग्स आणण्यासाठी वापर केला गेला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एनसीबीच्या अधिका-यांनी अधिकृत दुजोरा दिला नसला तरी याबाबत चौकशी सुरू असल्याची माहिती एनसीबीकडून देण्यात येत आहे. या प्रकरणी आतापर्यंत ८ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला असून, त्यात दोन महिलांचा समावेश आहे.
Join Our WhatsApp Community