धक्कादायक! मुंबईतील बारमध्ये चिकनऐवजी दिले जातेय ‘कबुतर स्टार्टर’?

155

मुंबईतील काही रेस्टाॅरंट आणि बारमध्ये स्टार्टरसाठी चिकनऐवजी कबुतराचा स्टार्टर दिला जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. एका सेवानिवृत्त लष्कर अधिका-याने यांसदर्भातील तक्रार पोलिसांत केली आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.

मुंबईतील सायन पोलिसांनी एका सेवानिवृत्त लष्कर अधिका-याच्या तक्रारीवरुन याप्रकरणी तपास सुरु केला आहे. दरम्यान, निवृत्त लष्करी अधिका-यांनी केलेले दावे खोटे की खरे, याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे. त्यामुळे एखाद्या बार किंवा रेस्टाॅरंटमध्ये एखादा चटपटीत स्टार्टर मागवताना जरा सावधान राहा.

तक्रारदार सेवानिवृत्त लष्कर अधिकारी कॅप्टन हरिश गगलानी यांनी एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, मी राहत असलेल्या इमारतीच्या गच्चीवर कबुतरांची फडफड मला नेहमी ऐकू यायची. एकदा संशय आल्यामुळे मी नक्की काय प्रकार आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पण गच्चीला कुलूप लावले होते. मी अग्निशमन दलाला बोलावून गच्ची उघडायला लावली. त्यावेळी गच्चीवर खूप कबुतरे पाळली जात असल्याचे निदर्शनास आले. कबुतरांना असे बंद पिंज-यात ठेवू शकत नाही, उघडपणे हा प्रकार सुरु असल्याचे गगलानी म्हणाले.

( हेही वाचा: चंद्रावर लवकरच मानवाची वस्ती; नासाने केला ‘हा’ मोठा दावा )

पोलिसांकडून तपास सुरु

हरिश गगलानी म्हणाले की, आमच्या इमारतीत कोणीही असे करत असेल तर ते चुकीचे आहे. कारण हा सोसायटीचा काॅमन पॅसेज आहे, त्यामुळे मी यावर आक्षेप घेतला. मी पोलिसांत तक्रार दाखल केली. पण पोलिसांनी याप्रकरणाची दखल घेतली नाही. त्यानंतर मी महाराष्ट्र स्टेट पोलीस कम्प्लेंट आॅथाॅरेटीकडे दाद मागितली. त्यांनी सूचना दिल्यानंतर पोलिसांनी एफआयआर दाखल केली असून पोलीस या प्रकरणाचा सध्या तपास करत आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.