स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आत्मार्पण दिनी ‘शोध हा नवा – शतजन्म शोधिताना’

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ५७व्या आत्मार्पण दिनानिमित्त स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकातील सावरकर सभागृहात ‘शोध हा नवा – शतजन्म शोधिताना’ या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने सावरकरप्रेमींना संगीत आणि नृत्याच्या माध्यमातून स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अनुभवता येणार आहे.
रविवार, २६ फेब्रुवारी २०२३ रोजी सायंकाळी ६ वाजता हा भव्य, देखणा कार्यक्रम ‘शतजन्म’च्या नृत्य दिग्दर्शिका, जेष्ठ कथ्थक नृत्यांगना डॉ. रुपाली देसाई यांच्या ‘संस्कृती कल्चरल अकॅडमी’कडून सादर करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात सावरकरांच्या अजरामर गीतांबरोबरच त्यांनी लिहिलेली लावणी, पोवाडा, फटका, त्यांच्या नाटकातील प्रवेश, त्यांची छायाचित्रं, त्यांच्या भाषणाची झलक, सावरकर चित्रपटातील दृश्य या साऱ्या माध्यमातून सावरकरांचे बहुआयामी व्यक्तिमत्व अधोरेखित होणार आहे. तरुणाई वीर सावरकर यांच्या विचारांकडे आकर्षित व्हावी या उद्देशाने स्वातंत्र्यवीर सावरकर या अशा कार्यक्रमाच्या रूपाने समोर मांडण्याची संकल्पना स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे यांनी मांडली आणि ती पुर्णत्वासही नेली. या कार्यक्रमाचा पहिला प्रयोग  २७ मे २००७  या दिवशी झाला होता. आता पुन्हा एकदा हा कार्यक्रम होणार आहे. याला निमित्तही वीर सावरकर यांचा आत्मार्पण दिन हे आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here