दिल्लीत न्यायालयातच गॅंगवॉरः हा कुख्यात गँगस्टर ठार

राजधानी दिल्लीतील रोहिणी न्यायालयात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. शुक्रवारी दुपारी न्यायालयात गोळीबार करण्यात आला असून, यात गँगस्टर जितेंद्र मान उर्फ गोगी याला ठार मारण्यात आले आहे. तीन अज्ञात व्यक्तींकडून हा गोळीबार झाल्याचे समजत असून, यात गोगीसह चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. दोन गँगमधील वैरापोटी ही हत्या करण्यात आल्याचे समजत आहे. यामध्ये दिल्लीतील टिल्लू गँगचा समावेश असल्याची माहिती मिळत आहे.

तीन हल्लेखोरांकडून हल्ला

गँगस्टर गोगी हा तिहार तुरुंगात होता. शुक्रवारी त्याला सुनावणीसाठी रोहिणी न्यायालयात हजर केले जात होते. याचदरम्यान वकिलांचे सोंग घेतलेल्या तीन हल्लेखोरांनी गोळीबार करत गोगीवर हल्ला चढवला. यावेळेस खुद्द न्यायाधीश सुद्धा हजर असल्याची माहिती मिळत आहे.

या टोळीचा समावेश

यावेळी पोलिसांकडून प्रत्त्युत्तरादाखल करण्यात आलेल्या गोळीबारात दोन हल्लेखोर ठार झाल्याची माहिती मिळत आहे. गोगीच्या हत्येमागे दिल्लीतील टिल्लू गँगचा हात असल्याचे बोलले जात आहे. दोन वर्षांपूर्वी गोगीला स्पेशल सेलने गुरुग्राममधून अटक केली होती. गोगीवर केलेल्या हल्ल्यात ठार झालेल्या दोघांवरही गंभीर गुन्हे दाखल असल्याचे समजत आहे. त्यापैकी एकाला पकडून देण्यासाठी पोलिसांकडून 50 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते, असे सांगण्यात येत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here