Shraddha Murder Case: श्रद्धा हत्याकांडात मोठा ट्विस्ट! आफताबने गुन्हा कबुल केला की नाही? सरकारी वकिलांनी केला खुलासा

श्रद्धा वालकर हत्याकांडाप्रकरणी संपूर्ण देश हादरला आहे.  या प्रकरणी रोज नवनवे धक्कादायक खुलासे समोर येत आहे. श्रद्धा हत्येप्रकरणी संशयित आरोपी आफताब पुनावाला याला आज, मंगळवारी दिल्ली पोलिसांनी न्यायालयात हजर केले होते. यावेळी आफताबला त्याच्या कुटुंबीयांना भेटण्याची परवानगी देण्यात आली होती. तसेच आफताबने श्रद्धाच्या हत्येची कबुली दिली होती, अशा बातम्यांही समोर आल्या होत्या. परंतू, आफताबला बाजू मांडण्यासाठी देण्यात आलेल्या सरकारी वकिलांनी याबाबत खुलासा केला आहे.

(हेही वाचा – Shraddha Murder Case : दिल्ली पोलिसांना सापडलेला जबडा नक्की कुणाचा? मुंबईतील डॉक्टर करणार खुलासा)

काय केला सरकारी वकिलांनी खुलासा

न्यायालयात आफताबने लिव्ह इन पार्टनर श्रद्धा वालकरची हत्या करण्याचा गुन्हा कबुल केलेला नाही, असा धक्कादायक खुलासा आरोपीच्या सरकारी वकिलांनी केला. आफताबच्या विरोधात गुन्हा हा परिस्थितीजन्य पुराव्यांनुसार आहे, जो त्याची मदत करू शकतो, असे आफताबला न्यायालयाने दिलेले वकील अविनाश कुमार यांनी म्हटले आहे. आफताब दिल्ली पोलिसांना सहकार्य करत आहे. परंतू, त्याने श्रद्धाची हत्या केल्याचे मान्य किंवा कबुल केलेले नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, मंगळवारी साकेत न्यायालयात आफताबला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्यात आले आहे. आफताबच्या पोलीस कोठडीत चार दिवसांची वाढ करण्यात आली आहे. तर चिथावणी आणि रागातून श्रद्धाची हत्या केल्याचे न्यायाधीशांना सांगितल्याचा दावा काही कायदेशीर वृत्त वेबसाईट बार अँड बेंचसह इतर माध्यमांनी केले होते. यावेळी आफताबने पोलिसांना सर्व काही सांगितल्याचे सांगण्यात आले होते. ही घटना आता आठवणे कठीण असल्याचे त्याने म्हटले आहे, असा दावाही करण्यात आला होता.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here