आई गेल्यानंतर एकट्या पडलेल्या श्रद्धाचा आफताबने घेतला गैरफायदा आणि…

115

श्रद्धा वालकर हत्याकांडामुळे संपूर्ण देश हादरला आहे. या प्रकरणात दररोज नवनवीन माहिती समोर येत आहे. त्यामुळे रोज या प्रकरणात नवीन खुलासे करण्यात येत आहेत. श्रद्धाच्या काही मित्र-मैत्रिणींनी श्रद्धा आणि आफताब यांच्या नात्याबाबत माहिती दिली आहे. श्रद्धाच्या एका जवळच्या मित्राने हिंदुस्थान पोस्टशी संवाद साधला असून त्याने या प्रकरणातील धक्कादायक खुलासा केला आहे.

एकट्या पडलेल्या श्रद्धाचा घेतला गैरफायदा

श्रद्धाची आपल्या वडिलांशी जास्त जवळीक नव्हती. त्यामुळे ती सर्व काही आपल्या आईला सांगायची. पण दीड वर्षांपूर्वी श्रद्धाची आई वारल्यानंतर श्रद्धाला एकटे वाटू लागले आणि त्याचाच गैरफायदा आफताबने घेतला. आफताबने श्रद्धाचा एकटेपणा दूर करण्याचे ढोंग केले आणि तिच्याशी जास्त जवळीक साधली. श्रद्धा आपल्या प्रेमात आकंठ बुडाली आहे हे कळताच आफताबमधला राक्षस जागा झाला आणि त्याने श्रद्धाला मारहाण करण्यापासून ते तिची हत्या करेपर्यंत गोष्टी केल्याचे मत श्रद्धाच्या मित्राने मांडले आहे.

(हेही वाचाः Shraddha Murder Case: श्रद्धाची हत्या केल्याची आरोपी आफताबची कबुली; म्हणाला जे काही घडले…)

आफताबचे पाशवी अत्याचार

2019 मध्ये श्रद्धा वालकर आणि आफताब पूनावाला यांच्या नात्याला सुरुवात झाली होती आणि याबाबतची माहिती तिने आपल्या जवळच्या मित्र-मैत्रिणींना दिली होती. हे दोघेजण तेव्हा नायगांव येथे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. पण तेव्हापासूनच आफताब श्रद्धाचा छळ करत होता आणि तिला बेदम मारहाण देखील करत होता. 2021 मध्ये आफताबने जळत्या सिगारेटने श्रद्धाच्या पाठीवर चटके दिले होते, जे तिने आपल्या एका मैत्रिणीला देखील दाखवले होते. त्यानंतर नालासोपारा येथील तुळींज पोलिस स्थानकात श्रद्धाने पोलिस केस देखील दाखल केल्याची माहिती श्रद्धाच्या मित्राने दिली.

आफताबने केले ब्लॅकमेल

तेव्हापासूनच श्रद्धाने आफताबला सोडून वेगळं राहण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार तिने त्याला सोडून देखील दिले होते. पण आफताबने पुन्हा एकदा तिला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. जर तू माझ्याकडे परत आली नाहीस तर मी आत्महत्या करेन आणि त्याची संपूर्ण जबाबदारी तुझी आणि तुझ्या घरच्यांची असेल, अशी धमकी आफताबने श्रद्धाला दिली आणि त्यामुळे घाबरलेल्या श्रद्धाने आफताबसोबत पुन्हा जाण्याचा निर्णय घेतला.

(हेही वाचाः श्रद्धा हत्याकांड प्रकरणः दिल्ली पोलिसांना आले मोठे यश, जंगलात सापडली कवटी आणि हाडांचे तुकडे)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.