Shraddha Murder Case : आफताबचे कृत्य सीसीटीव्हीत कैद; ३ तासात फेकले मृतदेहाचे तुकडे

वसईमधील तरुणी श्रद्धा वालकर हिच्या खुनाच्या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. लिव्ह इन रिलेशनमध्ये राहणाऱ्या श्रद्धाचा तिचा बॉयफ्रेंड आफताब पुनावाला याने सहा महिन्यांपूर्वी खून करून तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे केले आणि त्याची विल्हेवाटही लावली. या प्रकरणाबाबत दर दिवशी नवनवीन खुलासे समोर येत आहे. आरोपी आफताबने श्रद्धाची हत्या करून मृतदेहाचे तुकडे फेकले होते परंतु डोके, धड आणि हाताची बोटे फ्रिजमध्ये ठेवली होती. आफताबने हे तुकडे १८ ऑक्टोबरला तब्बल पाच महिन्यांनी जंगलात फेकले होते. आरोपीने एकाच दिवशी हे तुकडे फेकले होते.

( हेही वाचा : वर्ल्डकपमधील टीम इंडियाच्या पराभवानंतर BCCI चा मोठा निर्णय! संपूर्ण निवड समिती बरखास्त)

ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे, आपताबने रात्री साडेचार ते सकाळी साडेसात वाजेपर्यंत चार फेऱ्या मारल्या या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यामध्ये तो बॅग लटकवताना दिसत आहे. दरम्यान छतरपूर आणि मेहरौली जंगलातून जप्त केलेली हाडे ही मानवाची आहेत. ही हाडे प्राण्यांची नाहीत. असे एम्स आणि फॉरेन्सिक विभागाच्या डॉक्टरांनी अनौपचारिक संभाषणात पोलिसांना सांगितले आहे. फॉरेन्सिक विभागाने अद्याप याबाबत अहवाल दिलेला नाही.

पोलीस अजूनही शोध मोहीम राबवत आहेत. फॉरेन्सिक विभागाच्या अहवालानंतर जंगलात सापडलेली हाडे डीएनए चाचणीसाठी पाठवण्यात येणार आहेत.

आरोपी आफताब अमीन पूनावालाने काय कबूल केले?

पोलिसांनी कसून चौकशी केल्यावर आफताबने श्रद्धाचा खून केल्याची कबुली दिली. श्रद्धा त्याच्यावर लग्नासाठी दबाव आणत असल्याने त्याने वैतागून तिचा खून केल्याचे सांगितले. १८ मे पूर्वी एक आठवडाभर श्रद्धाला मारण्याचे त्याने मनाशी ठरवले होते. पण मारामारीदरम्यान श्रद्धा भावूक झाल्यामुळे तो मारू शकला नाही. १८ मे रोजी पूर्वी राहत असलेल्या वसईच्या घरातील सामान दिल्लीत कोण आणणार यावरून भांडण झाले आणि यानंतर आफताबने श्रद्धाचा गळा आवळून खून केल्याची कबुली दिली.

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here