श्रद्धा हत्याकांडात नवा खुलासा! चेहऱ्यावर अनेक जखमा, आफताबच्या निर्दयीपणाचा कहर

मुंबईतील वसईची तरूणी श्रद्धा वालकर हिचा दिल्लीत तिच्या आफताब पुनावाला या प्रियकराने खून केला. इतकेच नाही तर तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे केले आणि त्याची विल्हेवाटही लावली. या हत्याकांडाने संपूर्ण देश हादरला. श्रद्धाला आफताब जबर मारहाण करायचा मात्र ते हे सगळं सहन करून केवळ नातं टिकवण्याची धडपड करत होती. या प्रकरणाबाबत दर दिवशी नवनवीन खुलासे समोर येत आहे.

(हेही वाचा – “… हे आम्ही खपवून घेणार नाही”, चंद्रशेखर बावनकुळेंचा राहुल गांधींना इशारा)

आता या प्रकरणात श्रद्धाचा एक फोटो समोर आला आहे. या फोटोमध्ये श्रद्धाच्या चेहऱ्यावर आणि मानेवर बऱ्याच जखमा झाल्याचे दिसत आहे. गेल्या ६ महिन्यांपूर्वी आफताबने केलेला गुन्हा अखेर समोर आला असून पोलिसांकडून या प्रकरणात तपास आणि फॉरोन्सिकच्या मदतीन पुरावे गोळा करण्याचं काम सुरु आहे. तर दिल्ली पोलीस आता आफताबची चौकशी करण्यासाठी नार्को टेस्टही करणार आहे.

पोलीस ठोस पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचवेळी श्रद्धाचे अनेक फोटो समोर आले आहे. यातूनच आफताबची क्रूरता पुन्हा एकदा लोकांसमोर आली आहे. हा फोटो श्रद्धाच्या मित्राने समोर आणला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, डिसेंबर २०२० मधील हा फोटो आहे. यावेळी आफताबने श्रद्धाला जबर मारहाण केली होती. यानंतर श्रद्धाला ३ दिवस रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. या समोर आलेल्या फोटोत श्रद्धाच्या चेहऱ्यावर जखमी दिसत आहेत. इतके दिवस श्रद्धाने आफताबचा अत्याचार का सहन केला असा सवाल आता तिचे मित्र उपस्थित करत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here