shraddha murder case : पॉलिग्राफी टेस्ट करायला आलेल्या आफताबचे तुकडे करण्यासाठी नाचल्या तलवारी आणि…

142

श्रद्धा वालकर हिचे ३६ तुकडे करून तिचा निर्घृण खून करणारा आफताब याला सोमवारी, २८ नोव्हेंबर रोजी पॉलिग्राफी टेस्टसाठी आणण्यात आले. त्यावेळी त्याला जेव्हा पोलिसांच्या वाहनात बसवण्यात आले होते, त्यावेळी आफताबचे तुकडे करण्यासाठी तलवारी घेऊन काही जण तिथे आले. त्यामुळे पोलिसांची धांदल उडाली होती.

पोलिसांचा हवेत गोळीबार 

आफताब याला मारण्यासाठी आलेल्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी हवेत फायरिंग केली. त्यानंतर आफताबला घेऊन पोलिसांची गाडी जेलकडे रवाना झाली. हल्ला करणाऱ्यांनी पोलीस व्हॅनवर देखील हल्ला करण्याचा प्रयत्न केला. श्रद्धा वालकर हत्या प्रकरणी अटकेत असलेला मुख्य आरोपी अफताब पुनावाला याची पॉलिग्राफ टेस्ट करण्यात आली. त्यानंतर त्याला लॅबमधून जेलमध्ये नेले जात होते. या दरम्यान चार-पाच जणांनी हातात तलवार घेऊन अफताबवर हल्ल्याचा प्रयत्न केला. यावेळी हल्लेखोरांनी अफताब ज्या पोलीस व्हॅन होता त्या व्हॅनवर तलवारीने हल्ला केला. पोलिसांनी यावेळी त्यांना दूर सारण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान प्रसारमाध्यमाच्या काही प्रतिनिधींनी हल्ला करणाऱ्यांची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी अफताब विषयीचा संताप व्यक्त केला. आमच्या माता-बहिणींवर अत्याचार करत आहेत. मग त्याला अशाप्रकारे का मारु नये?, असा प्रतिप्रश्न एकाने केला.

(हेही वाचा शिवरायांवरील बेगडी प्रेम दाखवू नका, महाराजांचे नाव घेणे बंद करा! उदयनराजे यांनी मांडल्या भावना)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.