संपूर्ण देशाला श्रद्धा हत्याकांडाने हादरवून सोडले आहे. क्रुरकर्मा आफताबने श्रद्धाच्या शरिराचे 35 तुकडे करुन ते वेगवेगळ्या ठिकाणी फेकले. आफताबच्या रागाचा बळी ठरलेल्या श्रद्धाच्या वडीलांनी शुक्रवारी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि या भेटीनंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत, धर्म जागृतीवर भर दिला गेला पाहिजे. तसेच, आफताब पुनावाला आणि त्याच्या कुटुंबियांना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणीदेखील केली.
( हेही वाचा: आई आणि मुलाच्या नात्याला काळीमा; अडीच हजार फुटावरून फेकला आईचा मृतदेह )
श्रद्धाचे वडील म्हणाले की, श्रद्धाच्या हत्येमुळे आम्हाला अत्यंत दु:ख झाले आहे. दिल्ली गव्हर्नर यांच्याकडून मला न्याय मिळवून देण्याचे आश्वासन मिळाले आहे. आतापर्यंत झालेल्या तपासाबाबत दिल्ली पोलीस आणि वसई पोलीस यांचे काम संयुक्तपणे व्यवस्थित चालले असून, अगदी सुरुवातीस वसई येथील तुळींज पोलीस स्टेशन व मणिपूर पोलीस स्टेशन यांच्या काही असहकार्याच्या भूमिकेमुळे मला बराच त्रास सहन करावा लागला. त्याबद्दल चौकशी व्हावी, जर तसे झाले नसते तर, आज माझी मुलगी जीवंत असती, किंवा काही पुरावे मिळण्यास मदत झाली असती, असे विकास वालकर म्हणाले.
धर्मजागृती व्हावी
विकास वालकर म्हणाले जे व्यक्ती स्वतंत्र 18 वर्षानंतर दिले जाते, त्यावर विचार करायला हवा. त्यामुळे मला खूप त्रास सहन करावा लागला. मोबाईल अॅपवर सुद्धा मर्यादा हव्यात. यावर काऊन्सिलिंग व्हायला हवी, याबाबत धर्मजागृती व्हायला हवी. तुमच्या मुलांवर नियंत्रण ठेवले गेले पाहिजे. माझ्या मुलीने जेव्हा धर्म सोडला, तेव्हा तिची 18 वर्षे पूर्ण झाल्याचे ती म्हणाली.
Join Our WhatsApp Community