श्रद्धाच्या मोबाइलचा भायंदर खाडीत शोध सुरु

117

श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणाने देशभर संताप व्यक्त होत असून, गेल्या आठवडाभरापासून दिल्ली पोलीस आणि माणिकपूर पोलीस या प्रकरणावर छडा लावण्यासाठी विविध स्तरावर शोध घेत आहेत. दरम्यान, आरोपी आफताब याने पुरावा नष्ट करण्यासाठी श्रद्धाचा मोबाईल भाईंदरच्या खाडीत फेकल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून, पोलिसांकडून शोधमोहिम राबवली जात आहे.

दिल्ली पोलीस गेला आठवडाभर वसईमध्ये या प्रकरणाचा छडा लावण्याचा कसोशीने प्रयत्न करत आहेत. माणिकपूर पोलिसांच्या साह्याने ही शोधमोहिम सुरु आहे. भाईंदरच्या खाडीमध्ये रेल्वे लाइनच्या परिसरात बोटींच्या साह्याने श्रद्धाचा मोबाईल शोधला जात आहे. या गुन्ह्यामध्ये श्रद्धाचा मोबाईलही महत्त्वाचा ऐवज ठरणार आहे.

( हेही वाचा: FIFA 2022 : जपानने मॅचसोबत जिंकले संपूर्ण जगाचे मन! स्टेडियममध्ये दिला महत्त्वाचा संदेश; व्हिडिओ होतोय व्हायरल )

मागील पाच ते सहा दिवसांपासून दिल्ली माणिकपूर पोलीस श्रद्धाचे मित्र- मैत्रिण, डाॅक्टर, वडील, घरमालक, सोसायटीचे पदाधिकारी यांचे जाबजवाब नोंदवत आहेत. श्रद्धाच्या हत्येनंतर आफताब हा काही काळ तिचा मोबाईल वापरत होता. मात्र, त्यामुळे आपण अडचणीत येऊ, ही बाब त्याच्या लक्षात आल्यानंतर त्याने तिचा मोबाईल नष्ट करण्यासाठी भाईंदरच्या खाडीत टाकल्याची माहिती दिल्ली पोलिसांना दिल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे गुरुवारपासून दोन बोटींच्या साहाय्याने दिल्ली पोलीस भाईंदरच्या खाडीत शोध घेत आहेत.

बिंद्रे हत्येप्रकरणीही खाडीत घेतला शोध

याआधीही पोलीस अधिकारी अश्विनी बिंद्रे यांचा मृतदेह शोधण्यासाठी पोलिसांनी भाईंदरची खाडी ढवळून काढली होती. आता दिल्ली व माणिकपूर पोलिसांना काही पुरावा मिळतो का, यासाठी भाईंदरच्या खाडीत शोधमोहिम सुरु केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.