Sharddha Murder Case: ‘जाणारा प्रत्येक दिवस…’, श्रद्धाची ‘ती’ पोस्ट ठरली शेवटची

125

संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या श्रद्धा हत्याकांड प्रकरणी एकमागून एक नवीन धक्कादायक खुलासे समोर येत आहे. हत्या करणारा आरोपी आफताब अमीन पूनावालाची क्रूरता पाहून सर्वांच्याच हृदयाचा ठोका चुकला आहे. अशातच श्रद्धा वालकर या हिंदू मुलीचा खून सहा महिन्यांपूर्वी मे महिन्यात झाला, असा दावा पोलिसांनी या घटनेनंतर केला. तर श्रद्धाचा मित्र लक्ष्मण नाडर याने जुलै महिन्यात श्रद्धाशी संभाषण केले होते. त्यामुळे श्रद्धाचा खून नेमका कधी झाला, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, मे महिन्यात श्रद्धा आणि आफताब हिमाचल प्रदेशात फिरायला गेले होते. तेथे काही दिवस दोघेही एकत्र होते. या दरम्यान श्रद्धाने ११ मे रोजी फेसबुकवर एक फोटो पोस्ट केला होता. या पोस्टद्वारे तिने ‘Exploring More And More Every Passing Day” असे कॅप्शन दिले होते. ती पोस्ट आता श्रद्धाची शेवटची असल्याचे सांगितले जात आहे.

(हेही वाचा – श्रद्धापेक्षा भयंकर अनुपमाची कहाणी! ७२ तुकडे केले, फ्रीजरमध्ये ठेवले आणि…)

2
अशी माहिती समोर आली आहे की, १६ मे रोजी त्यांचा लिव्ह इन रिलेशनशीपच्या दिवसाचा वाढदिवस होता. त्यानिमित्ताने दोघेही हिमाचल प्रदेशात फिरायला गेले होते. आफताबने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, श्रद्धाने लग्नासाठी तगादा लावल्याने आपण तिची कंटाळून तिची हत्या केल्याची कबूली दिली आहे. यावेळी त्याने ३५ तुकडे करून दिल्ल्याच्या परिसरात फेकल्याची माहिती त्याने दिली आहे. श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे शोधता यावेत, यासाठी दिल्ली पोलिसांनी आफताबला मंगळवारी मेहरौलीच्या जंगलात नेले होते. पोलिसांना आतापर्यंत १२ तुकडे मिळाल्याचे सांगितले. फॉरेन्सिक तपासणीनंतरच हे तुकडे श्रद्धाचे आहेत, की नाही याची पुष्टी होणार आहे. मात्र गुन्हा करण्यासाठी वापरण्यात आलेला चाकू या नराधमाकडून जप्त करण्यात आला आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.