श्रद्धा वालकर हत्याकांडानंतर देशभरात एकच खळबळ उडाली. आफताब पुनावालाने श्रद्धाचा गळा दाबून खून केल्यानंतर तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे करुन मोहालीच्या जंगलात फेकले. यातच आता पोलीस आरोपी आफताब याची कसून चौकशी करत आहेत. याचदरम्यान, आता श्रद्धाचे वडील विकास वालकर यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आफताब पुनावाला याला कठोर शिक्षा व्हावी, सोबतच आफताबच्या कुटुंबातील सदस्यांची सुद्धा चौकशी केली जावी, तसेच त्यांनासुद्धा शिक्षा द्यावी असे म्हटले आहे.
( हेही वाचा: श्रद्धाच्या वडिलांचे धर्मजागृतीबाबत मोठे विधान; म्हणाले… )
श्रद्धाचे वडील पुढे म्हणाले की, श्रद्धाला ब्लॅकमेल केले जात असणार त्यामुळे तिच्यावर जे अत्याचार होत होते त्यावर तिने आम्हाला काहीही सांगितले नाही. माझा श्रद्धा- आफताबच्या नात्याला विरोध होता. डेटिंग अॅपमुळे ती त्याच्या संपर्कात आली आणि त्यातून ती रिलेशनशिपमध्ये आली. दरम्यान, आम्हाला सरकारकडून वकिल दिला जाणार आहे. त्यासोबत या केसमध्ये दिल्लीचे वकील सीमा कुशवाह यादेखील आमची बाजू मांडतील, असे वालकर यावेळी म्हणाले.
Join Our WhatsApp Community