आर्थिक संकटांचा सामना करणा-या श्रीलंकेत सरकारविरोधात आक्रमक आंदोलने केली जात आहेत. आता या आंदोलकांनी शनिवारी कोलंबोमधील राष्ट्रपती भवनाला घेराव घातला. त्यानंतर गोटाबाया राजपक्षे त्यांचे अधिकृत निवासस्थान सोडून पळून गेले. एएफपी या वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे.
Video footage of Sri Lankan protesters taking over President's office in Colombo
📸 Buddi U Chandrasiri pic.twitter.com/FINwaaqUat
— NewsWire 🇱🇰 (@NewsWireLK) July 9, 2022
आंदोलकांनी राष्ट्रपती भवनाला घातला घेराव
श्रीलंकेतील मानवाधिकार संघटना, राजकीय पक्षांच्या वाढत्या दबावानंतर पोलिसांनी शनिवारी संचारबंदी हटवली. यापूर्वी विरोधकांचे आंदोलन रोखण्यासाठी कोलंबोसह पश्चिम प्रांतामधील सात भागांमध्ये संचारबंदी लागू होती. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आंदोलकांनी शनिवारी दुपारी राष्ट्रपती भवनाला घेराव घातला आणि तोडफोड सुरु झाली. या तोडफोडीनंतर गोटाबाया राजपक्षे घर सोडून पळून गेले.
( हेही वाचा: शिवसेनेचे हायकमांड ‘मातोश्री’, मग दिल्लीला गेलेले मुख्यमंत्री शिवसेनेचे कसे? राऊतांचा सवाल )
पंतप्रधानांनी बोलावली तातडीची बैठक
राजधानी कोलंबोमध्ये आंदोलन अधिक चिघळले आहेत. पोलिसांसोबत झालेल्या झटापटीमध्ये 100 पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. देशातील बिघडलेली परिस्थिती हाताळण्यासाठी पंतप्रधान विक्रमसिंघे यांनी तातडीची बैठक बोलावली आहे.
Join Our WhatsApp Community