मुंबईत प्रभादेवी येथे असलेले सिद्धिविनायक मंदिर हे फक्त हिंदूंचे प्रार्थनास्थळ नाही. तर या मंदिराला ऐतिहासिक महत्त्वही आहे. हे मंदिर म्हणजे एक कालातीत चमत्कार आहे. दरवर्षी हजारोंच्या संख्येने भाविक आणि पर्यटक या सिद्धिविनायक मंदिरात येऊन बाप्पाचं दर्शन घेतात. या मंदिराची वैभवशाली वास्तुकला इथे येणाऱ्या प्रत्येकाला थक्क करते. (Siddhivinayak Mandir Mumbai)
आपला प्रिय गणपती बाप्पा सिद्धिविनायक रुपात या मंदिरात वसलेला आहे. या मंदिराची आभा सकारात्मक आणि प्रचंड शक्तिशाली आहे. तसेच हे मंदिर त्याठिकाणी जाणवत असलेल्या दैवी चैतन्यासाठी प्रसिद्ध आहे. (Siddhivinayak Mandir Mumbai)
आज आम्ही तुम्हाला या सिद्धिविनायक मंदिराविषयी अशाच आणखी काही इंटरेस्टिंग गोष्टी सांगणार आहोत. चला तर मग सुरू करूयात सिद्धिविनायक मंदिराचा ऐतिहासिक प्रवास… (Siddhivinayak Mandir Mumbai)
(हेही वाचा – IPC 406 In Marathi : काय आहे IPC चा कलम ४०६? आणि याअंतर्गत कशी होते शिक्षा?)
१. मंदिराला आहे खूप जुना इतिहास
सिद्धिविनायक मंदिराविषयी सर्वात महत्वाचं सांगायचं म्हणजे हे मंदिर दोनशे वर्षं जुनं आहे. दोनशे वर्षांपूर्वी या मंदिराची स्थापना करण्यात आली तेव्हापासून हे मंदिर भाविकांसाठी एक महत्त्वाचं आध्यात्मिक स्थळ बनलेलं आहे. (Siddhivinayak Mandir Mumbai)
२. प्रवासासाठी सोयीस्कर मंदिर
हे मंदिर मुंबईतील दादर रेल्वेस्थाकाच्या प्रभादेवी या ठिकाणी स्थित आहे. दादरहूनही सिद्धिविनायक मंदिरात जाण्यासाठी शेअर टॅक्सी आणि लोकल बस सहज उपलब्ध आहेत. प्रवासाच्या सुलभतेमुळे या मंदिरात संपूर्ण भारतातल्या आणि भारताबाहेरच्या भाविकांना तसेच पर्यटकांना येणे सोपे जाते. (Siddhivinayak Mandir Mumbai)
३. मंदिराची भव्यता आणि वास्तुकला
सिद्धिविनायकाचे दर्शन घेण्यासाठी येणारे भक्तगण आणि पर्यटक या मंदिराची वास्तुकला पाहून अगदी थक्क होऊन जातात. या मंदिरात एक वेगळीच वास्तुशिल्प शैली पाहायला मिळते. मंदिराचा दगडी दर्शनी भाग आणि या मंदिराची भव्यता खरोखरच थक्क करणारी आहे. या मंदिरात केलेलं क्लिष्ट कोरीव काम हे आपल्या प्राचीन वास्तुकलेचा उत्तम नमुना तर आहेच पण त्यासोबतच भारतातल्या कारागिरांची उत्कृष्ट कला यातून झळकते. या मंदिराच्या गाभाऱ्याच्या छताला आतून शुद्ध सोन्याचा मुलामा दिलेला आहे. यामुळे या मंदिराच्या वस्तूची शोभा द्विगुणित होते. (Siddhivinayak Mandir Mumbai)
४. लोकप्रिय देवस्थान
सिद्धिविनायकाचे हे मंदिर अतिशय लोकप्रिय देवस्थानांपैकी एक आहे. इथलं शांत, सकारात्मक आणि आध्यात्मिक वातावरण लोकांना आकर्षित करतं. दरवर्षी इथे हजारोंच्या संख्येने भाविक आपल्या बाप्पाचं दर्शन घ्यायला येतात. (Siddhivinayak Mandir Mumbai)
५. सुरळीत दर्शनासाठी व्यवस्था
या मंदिराच्या लोकप्रियतेमुळे भाविकांची प्रचंड गर्दी असते. या भाविकांमध्ये सर्वसामान्य लोकांपासून ते मोठमोठे उद्योजक, व्यापारी, सिलेब्रिटीज, राजकारणी अशा कित्येक VIP लोकांचाही समावेश आहे. त्यामुळे बाप्पांचे दर्शन सगळ्यांना सुरळीतपाने घेता यावे यासाठी या मंदिरात वेगवेगळ्या रांगांचं विभाजन केलेलं आहे. त्यामध्ये मोफत दर्शन, पास घेऊन दर्शन आणि VIP लोकांसाठी वेगवेगळ्या रांगा सोडण्यात येतात. (Siddhivinayak Mandir Mumbai)
६. गणपतीच्या आठ रुपांपैकी एक सिद्धिविनायक
सिद्धिविनायकाचे मंदिर हे गणपतींच्या आठ रुपांपैकी एक सिद्धिविनायक रूपाच्या प्रतिमेच्या विशिष्ट पूजेसाठी प्रसिद्ध आहे. बाप्पाचं हे स्वरूप उंदरावर स्वार होऊन बसले आहे. त्यांच्या दोन्ही बाजूंना रिद्धी आणि सिद्धी उभ्या आहेत. गणपतीचं हे रूप अतिशय सुंदर आणि मनमोहक आहे. (Siddhivinayak Mandir Mumbai)
७. मंदिराचं परोपकारी ट्रस्ट
सिद्धिविनायक मंदिराचं स्वतःचं ट्रस्टही आहे. या ट्रस्टद्वारे अनेक गरजू लोकांना, वैद्यकीय, शैक्षणिक, निवासस्थान आणि इतर सामाजिक सुविधा दिल्या जातात. (Siddhivinayak Mandir Mumbai)
८. गणेशोत्सवाची भव्यता
या मंदिरात गणेश चतुर्थी अगदी धुमधडाक्यात साजरी केली जाते. वर्षातून एकदा या मंदिरातलं वातावरण इतर दिवसांपेक्षा काही औरच असते. उत्सवाच्या काळात मंदिर आणि त्याच्या आसपासचा परिसर सुशोभित केला जातो. त्यावेळी या मंदिराची आणि उत्सवाची दिव्यता पाहण्यासाठी भक्तगण हजारोंच्या संख्येने गर्दी करतात. (Siddhivinayak Mandir Mumbai)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community