अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या भीमा केसरी स्पर्धेत पंजाबच्या नामवंत मल्लाला माती चारत सिकंदर शेखने विजय मिळवला. सिकंदर शेखने पंजाबच्या भूपेंद्रसिंहला चितरट केले. तसेच, महेंद्र गायकवाड याने देखील चांगला खेळ करत पंजाबच्या पैलवानाचा पराभव केला. या दोन्ही मल्लांनी हजारो कुस्ती शौकिनांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. महाराष्ट्र केसरीएवढ्याच भव्य रितीने आयोजित केलेल्या या भीमा केसरी स्पर्धेकडे सिकंदर आणि महेंद्र यांच्या उपस्थितीमुळे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले होते.
भूपेंद्रसिंहला चारली धूळ
शेवटची कुस्ती सिंकदर शेखची होती. पंजाबचा सहा फूट उंच आणि धिप्पाड असा भूपेंद्रसिंह अजनाला याच्याविरुद्ध सिंकदर शेख भिडणार होता. भूपेंद्रसिंह अजनाला आखाड्यात उताराला तेव्हा सर्वच कुस्ती शौकिनांना सिंकदरची काळजी वाटू लागली होती. सुरुवातीला भूपेंद्रने सिकंदर याच्यावर आघाडी घेण्यास सुरुवात केली होती. मात्र, त्यानंतर सिकंदरने आपला ठेवणीतला खेळ सुरु करत डावपेचात टाकत भूपेंद्रला चितपट करत भीमा केसरी खिताब पटकावला.
( हेही वाचा India VS New Zealand : रोहित-शुभमन गिलची शतकी खेळी! नाबाद २०० धावांची भागिदारी )
महेंद्र गायकवाडचा विजयी जल्लोष
महेंद्र गायकवाड याची कु्स्ती पंजाब युनिव्हर्सिटी चॅम्पियन गोरा अजनाला या दिग्गज मल्लाशी होती. हे दोन्ही मल्ल मैदानात उतरल्यापासून महिंद्राने आपला नेहमीचा खेळ करण्यास सुरुवात केल्याने पंजाबच्या गोरा या मल्लाने अनेकवेळा मैदानातून पळ काढण्याचा प्रयत्न सुरु केला. त्या प्रत्येकवेळी महिंद्राने त्याला आखाड्यात ओढले. कुस्ती सुरु होताच महिंद्राने गोराला उचलून चितपट केले. त्यानंतर महेंद्रने विजयी जल्लोष साजरा केला.
Join Our WhatsApp Community