खलिस्तानींचे आता ‘कोविड’ बनले नवे शस्त्र! 

काश्मीरमधून अनुच्छेद ३७० आणि ३५ ए हटवल्यानंतर खोऱ्यात शांतता निर्माण झाली आहे. हे शत्रू राष्ट्रांच्या पचनी पडले नाही. त्यामुळे आता ते खलिस्तानींच्या नावाखाली देशात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.  

येनकेनप्रकारेण भारतात फुटीरतेची बीजे रोवण्यासाठी दहशतवादी खलिस्तानी नवनवीन कारणे शोधत असतात. मागील वर्षभरापासून केंद्राच्या कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब आणि हरियाणा या दोन राज्यांतील शेतकऱ्यांची माथी भडकवण्याचा आणि दंगली घडवून देशात अशांततेचे वातावरण निर्माण करण्याचे कारस्थान खलिस्तानींनी रचले. याला सिख फॉर जस्टीस (एसएफजे) संस्थेचे समर्थन होते. आता या संस्थेने देशभरात थैमान घालत असलेल्या कोविड-१९ या महामारीचे निमित्त करून गरजू कुटुंबांना अर्थसहाय्य करत त्यांना मिंद्यात ठेवण्यास सुरुवात केली आहे.

अमेरिकेत राहून भारतात नियंत्रण ठेवले जाते!

अशा रीतीने सिख फॉर जस्टीस ही संस्था दहशतवादाचा पैसा महामारीशी झुंझणाऱ्या गोरगरीब जनतेला देऊन त्यांच्यावर प्रभाव टाकत आहे. ही संस्था कोरोनाबाधित गरीब रुग्णांच्या नातलगांना ऑक्सिजन आणि दहा हजार रुपये अर्थसहाय्य करण्यासाठी त्यांच्याकडून अर्ज भरून घेत आहे. यासाठी सिख फॉर जस्टीस या संस्थेचा मुखिया खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंह पन्नू या यामागील प्रमुख सूत्रधार असल्याची माहिती मिळत आहे. तो अमेरिकेत राहून तेथून पैशाच्या जोरावर असा प्रकारे कधी कृषी कायदे, तर कधी कोविड अशा माध्यमातून देशात पुन्हा खलिस्तानी चळवळ रुजवण्याचा प्रयत्न करत आहे.

सरकारवर निशाणा! 

या समाजकंटक, दहशतवादी संघटना भारताच्या शत्रू राष्ट्राच्या हातातील बाहुले बनून कार्य करत आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या संघटनेने देशातील शेतकऱ्यांनी केलेल्या कृषी कायद्यांविरोधातील आंदोलनात पैशाच्या बळावर घुसखोरी करून खलिस्तानी चळवळीचे झेंडे फडकवले होते, त्यासाठीच्या सूचना संबंधितांना वेळोवेळी मिळत होत्या, हा चौकशीचा विषय आहे. आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत त्यांना पंजाबमधील जनतेपर्यंत पोहचण्याची नवीन संधी मिळाली आहे. येथील जनतेला मदत करण्यासाठीच्या नावाखाली गुरपतवंत सिंह पन्नू अमेरिका, कॅनडा, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया आणि युरोप येथून पैसा जमा करत आहे.

(हेही वाचा : सरकारच्या बदनामीसाठी खलिस्तानींचा कोणता आहे नवा ‘प्लॅन’? वाचा…)

खलिस्तानी ऑक्सिजन! 

एका संदेशामध्ये खलिस्तानी संस्था म्हणते कि, कोविड -१९ ने संक्रमित रुग्णांना एसएफजे ४० लाख डॉलर ऑक्सिजन निधीच्या रूपाने वितरित करणार आहे. याकरता शीख फॉर जस्टीसने पोर्टल लाँच केले आहे. त्यामाध्यमातून जे एसएफजेकडून मदत घेऊ इच्छित आहेत, ते त्यांची नोंदणी या पोर्टलवर करू शकणार आहेत.

भारतात अस्थिरता निर्माण करण्याचे कारस्थान! 

खलिस्तान चळवळीच्या माध्यमातून सिख फॉर जस्टीस ही संस्था कायम कार्यरत असते. ही संस्था शिखांचे जनमत जमवण्यासाठी विदेशात राहणाऱ्या शिखांचे संघटन करत आहे. आता या संघटनाच्या जोरावर अशांतता निर्माण करण्याचा मनसुबा आखला आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न    

 गुरपतवंत सिंह पन्नू याच्या सोबत कॅनडातील गुरमीत सिंह, धालीवाल, अनिता लाल सारखे लोक आहेत. ज्यांनी शेतकरी आंदोलनात घुसखोरी केली. यामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा मलीन करण्याचे षडयंत्र रचण्यात आले होते. यासाठी ग्रेटा थनबर्ग हिने टूलकिट सोशल मीडियातून प्रसारित केली होती. या कामासाठी तिने भारतातील तरुणांना एजंट बनवले होते.

(हेही वाचा : खलिस्तानी समर्थकांची ब्रिटनच्या संसदेबाहेर भारतविरोधात निदर्शने!)

भारतात प्रस्थ वाढवण्याचा प्रयत्न 

सिख फॉर जस्टीस २०२० पासून जनमत उभे करण्याच्या प्रयत्नात आहे. याकरता ते भारताचे शत्रू राष्ट्र आणि खलिस्तानी समर्थकांकडून पैसा जमा करत आहे. आता कोरोनाबाधित गरीब रुग्णांना अर्थसहाय्य करून ही संस्था पुन्हा एकदा भारतात प्रस्थ वाढवण्याचा प्रयत्न करत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here