जयगड जवळ समुद्रात सिंगापूरचे तेलवाहू बार्ज उलटले!

74

रत्नागिरी तालुक्यातील जयगड जवळ समुद्रात मंगळवारी सकाळी एक सिंगापूरचे तेलवाहू बार्ज उलटले, अशी माहिती मिळतेय. त्यामुळे समुद्र किनारा परिसरात तेलाचा तवंग पसरण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. तसेच समुद्र किनारी वाहून येणाऱ्या कोणत्याही वस्तुंना हात न लावण्याच्या सूचना तटरक्षक दलाकडून देण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाचे अधिकारी उगलमुगले आणि गोसावी यांनी या घटनेची नोंद घेतली आहे. ते पुढील कार्यवाही करणार असल्याची माहिती गुहागरच्या तहसीलदार प्रतिभा वराळे यांनी दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, सिंगापूर येथील तेल कंपनीची तेलवाहू नौका गेल्या २२ जून रोजी कोलंबो येथून निघाली. ती समुद्रात कलंडल्याने त्याचा समुद्रातील संपर्क तुटला होता. गेल्या ९ जुलैपासून रडारवर या नौकेचा ठावठिकाणा लागत नव्हता. त्यामुळे नौकेचा शोध सुरू होता. ही नौका रत्नागिरी तालुक्यातील जयगडजवळच्या खोल समुद्रात किनाऱ्यापासून १३ सागरी मैलांवर काल तटरक्षक दलाला आढळली होती. आज सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ही नौका पूर्णपणे उलटली. सुदैवाने या बार्जवरील कर्मचारी सुरक्षित आहेत.

(हेही वाचा – अमरावतीत पावसामुळे घर जमीनदोस्त, दोघांचा मृत्यू तर ३ जण गंभीर)

मंगळवारी सकाळी सिंगापूर कंपनीचं मोठं तेलवाहू बार्ज बुडत असल्याचे नागरिकांच्या लक्षात आले. हे बार्ज सिंगापूरचे असल्याची प्राथमिक माहिती आहे. ही घटना कशामुळे घडली याचे कारण अद्याप समोर आले नाही. दरम्यान, हे बार्ज पलटी झाल्याने किनारा परिसरातील नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, सोमवारी मध्यरात्री गुहागर तालुक्यातील पालशेत समुद्र किनारी आल्याचे सांगितले जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.