मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बीकेसीत तर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंचा शिवाजी पार्कात नुकताच मेळावा रंगला. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने शिवसेनेचे नवे गाणे प्रदर्शित केले. लोकप्रिय गायक अवधूत गुप्ते यांनी हे गाणे शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात गायले. त्यामुळे अवधूत गु्प्ते शिंदे गटात सामील झाल्याच्या चर्चा रंगल्या. अखेर अवधूतने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सर्व चर्चांवर भाष्य केले आहे.
अवधूत गुप्ते यांची पोस्ट
अवधूत यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलयं की, रसिक मायबाप, बीकेसीवर दस-यानिमित्त झालेल्या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आमंत्रणानुसार एक गायक म्हणून दोन गाणी सादर केली. या पार्श्वभूमीवर मी शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या. अवधूत गुप्ते म्हणाले की, माझ्याकडे अद्याप कोणत्याही पक्षाचे साधे प्राथमिक सदस्यत्वदेखील नाही. तसेच, मी कोणत्याही पक्षात वा गटात प्रवेश केलेला नाही. तुम्ही माझा प्रेक्षकवर्ग, चाहते, फाॅलोअर्स हे माझे मायबाप आहात. त्यामुळे तुम्हाला या गोष्टीचे स्पष्टीकरण देणे मी माझे उत्तरदायित्व समजतो. मी याआधीही वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या व्यावसपीठावरुन माझी कला सादर केल्याचे तुम्ही जाणताच… माझ्या लेखी हा विषय इथेच संपला. अशा आशयाची पोस्ट अवधूत गुप्ते यांनी पोस्ट केली.
( हेही वाचा: दीड वर्षांच्या चिमुकल्या बाळाच्या नावाने राजकारण केलंत?; श्रीकांत शिंदेंचे उद्धव ठाकरेंना पत्र )
अवधूत गुप्ते हे मागच्या काही दिवसांपासून शिंदे गटाच्या अनेक कार्यक्रमांना दिसला आहे. त्यामुळे त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला की काय, अशा चर्चा रंगल्या.
Join Our WhatsApp Community