प्रसिद्ध गायक आणि संगीतकार बप्पी लहरी यांचं बुधवारी निधन झालं. ते ६९ वर्षांचे होते. मुंबईतील क्रिटी केअर रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बप्पी लहरीच्या निधनाने संगीत क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. ८० च्या दशकातील हटके अनोख्या शैलीने तरूणाईला डिस्को डान्सने थिरकवणारे बप्पीदा काळाच्या पडद्याआड गेले आहे.
Singer-composer Bappi Lahiri dies in Mumbai hospital, says doctor
— Press Trust of India (@PTI_News) February 16, 2022
गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र आज जुहू येथील क्रिटी केअर हॉस्पिटमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 2021 मध्ये बप्पी लहरी यांना कोरोनाची बाधा झाली होती. परंतू त्यांनी कोरोनावर यशस्वी मात केली.
बप्पी लहरी यांच्या बद्दल…
बप्पी लहरी यांचा जन्म 27 नोव्हेंबर 1952 रोजी पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी येथे झाला. बप्पी लहरी यांचे मूळ नाव आलोकेश लहरी असे होते. त्यांना प्रेमाने बप्पीदा असेही संबोधले जाते. बप्पी यांनी संगीतबद्ध केलेली अनेक गाणी लोकप्रिय ठरली आहेत. बप्पी यांनी 2014 साली भाजपकडून पश्चिम बंगालमध्ये लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
बप्पी लहरी यांचे गाजलेले गाणे
- दे दे प्यार दे
- आज रपट जाये तो
- थोडीसी जो पी ली है
- यार बिना चैन कहाॅं रे
- इंतहा हो गयी,इंतजार की
- आय एम ए डिस्को डांन्सर
- चलते चलते मेरे ये गीत याद रखना