भारतीय संगीत जगताला आणखी एक धक्का बसला आहे. बॉलिवूड गायक कृष्णकुमार कनाथ उर्फ के.के. यांचे निधन झाले आहे. 53 वर्षीय केके यांनी मंगळवारी कोलकाता येथील नझरुल मंच येथे महाविद्यालयीन कार्यक्रमात सादरीकरण केले होते. त्यानंतर केके हॉटेलमध्ये गेले आणि तिथे ते बेशुद्ध पडले. त्यांना तातडीने कोलकाता येथील सीएमआरआय रुग्णालयात नेण्यात आले, तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.
रिपोर्ट्सनुसार, लाइव्ह शोनंतर केकेला अस्वस्थ वाटत होते. शो संपल्यानंतर तो हॉटेलवर परतला. खोलीत प्रवेश करताच तो बेशुद्ध पडल. त्याला शुद्धीवर आणण्याचे प्रयत्न करण्यात आले, मात्र यश आले नाही. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. केके यांचा मृतदेह सध्या रुग्णालयात आहे. बुधवारी सकाळी ९ वाजता दिवंगत गायकाचे एसएसकेएम रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात येणार आहे.
( हेही वाचा: तुमची ऑनलाइन फसवणूक झालीय? विमा काढा, निर्धास्त राहा )
पीएम मोदींनी श्रद्धांजली वाहिली
गायक के.के. त्यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. पीएम मोदींनी त्यांच्या ट्विटमध्ये लिहिले की, ‘केके या नावाने प्रसिद्ध गायक कृष्णकुमार कनाथ यांच्या आकस्मिक निधनाने खूप दुःख झाले. सर्व वयोगटातील लोकांच्या मनाला भिडणाऱ्या अनेक प्रकारच्या भावना त्यांच्या गाण्यात होत्या. त्यांच्या गाण्यांमधून लोक त्यांना कायम स्मरणात ठेवतील. चाहते आणि कुटुंबियांना माझ्या संवेदना. ओम शांती.
Saddened by the untimely demise of noted singer Krishnakumar Kunnath popularly known as KK. His songs reflected a wide range of emotions as struck a chord with people of all age groups. We will always remember him through his songs. Condolences to his family and fans. Om Shanti.
— Narendra Modi (@narendramodi) May 31, 2022
श्रेया घोषालने व्हिडिओ शेअर केला
गायिका श्रेया घोषालने केकेच्या शेवटच्या परफॉर्मन्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये तो ‘दिल इबादत’ हे लोकप्रिय गाणे म्हणत आहे. व्हिडिओसोबत श्रेया घोषालने लिहिले की, ‘म्युझिक मास्टर के.के. चा मृत्यू त्यांचा नझरूल मंचवरील शेवटचा संगीत कार्यक्रम.
Join Our WhatsApp CommunityThe master of music #KK just passed away. His last music show at Najrul Mancho #kolkata #WestBengal pic.twitter.com/0359ih0sI3
— Shreya (@shreya__online) May 31, 2022