प्रसिद्ध गायक कृष्णकुमार कुननाथ अर्थात केके यांच्यावर गुरुवार, २ जून रोजी वर्सोवा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या वडिलांनी त्यांना मुखाग्नी दिली. केके यांच्यावर अंत्यसंस्कार झाल्यावर ‘केके अमर रहे’ अशा घोषणा दिल्या जात होत्या. केके यांच्यावरील अंत्यसंस्कारानंतरही त्यांच्या मृत्यूमागील कारणांवर चर्चा सुरु झाली आहे. केके यांचा शवविच्छेदनाचा अहवाल आला आहे. त्यामध्ये केके यांना जर वेळेत सीपीआर दिला असता तर त्यांचा जीव वाचला असता, असे डॉक्टरांनी म्हटले आहे. सीपीआर म्हणजे हृदयविकाराचा झटका आल्यानंतर संबंधित व्यक्तीच्या हृदयावर दाब देऊन बंद पडलेले हृदय सुरु करण्याचा प्रयत्न केला जातो.
शवविच्छेदन अहवालात काय म्हटले?
केके यांची कोलकता येथे लाईव्ह कॉन्सर्ट दरम्यान अचानक प्रकृती खालावली, कार्यक्रम संपवून हॉटेलमध्ये परतताच केके कोसळले. त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. १ जूनला केके यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. यामध्ये केकेंचा मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्याने झाल्याचे अहवालातून समोर आले. यात केकेंचे यकृत आणि फुफ्फुस उत्तम अवस्थेत नव्हती, अशी माहिती अहवालातून समोर आली. शवविच्छेदन करणाऱ्या एका डॉक्टरांनी केकेंच्या मृत्यूबद्दल महत्त्वाचा खुलासा केला आहे. केकेंच्या हृदयात काही ब्लॉकेज होते. त्यांना योग्यवेळी सीपीआर मिळाला असता, तर त्यांचा जीव वाचवता आला असता, अशी माहिती डॉक्टरांनी दिली. केके यांचा कार्यक्रम सुरू असताना केकेंची प्रकृती अचानक बिघडली. केके घामाघूम झाले होते. ते वारंवार घाम पुसत होते. सभागृहातील एसीबद्दल त्यांनी अनेकदा विचारणा केली होती. सभागृहात क्षमतेच्या तिप्पट गर्दी असल्याने केके यांना त्रास झाला. कार्यक्रम संपताच त्यांनी हॉटेल गाठले. त्यांच्या छातीत दुखत होते, अस्वस्थ वाटत होते.
(हेही वाचा माफीचा साक्षीदार झाल्याने सचिन वाझे सुटणार आणि अनिल देशमुख अडकणार का?)
नऊ भाषांमध्ये केली गाणी रेकॉर्ड
केके यांनी हिंदीसोबतच नऊ भाषांमधील गाणी रेकॉर्ड केली आहेत. हिंदी चित्रपटांमध्ये केकेने २०० पेक्षा जास्त गाणी गायली आहेत. फिल्मफेयर अवार्ड देऊन देखील केके यांनी गौरवण्यात आले आहे.
Join Our WhatsApp Community