आता शंकर महादेवन यांची ब्रेथलेस हनुमान चालिसा

164

प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक आणि गायक शंकर महादेवन हे नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असतात. ते नेहमी संगीतात विविध हटके प्रयोग करताना दिसतात. काही वर्षांपूर्वी त्यांनी संगीत क्षेत्रात ‘ब्रेथलेस’ ही नवी संकल्पना आणली आणि ती फार प्रसिद्ध झाली होती. यानंतर आता लवकरच शंकर महादेवन ‘ब्रेथलेस’ हनुमान चालिसा गाताना दिसणार आहेत. नुकतेच त्यांनी याबाबत घोषणा केली आहे.

 क्रु अॅपद्वारे घोषणा

शंकर महादेवन यांनी क्रु अॅपद्वारे याबाबतची घोषणा केली आहे. शेमारु भक्ती या अकाऊंटवरुन शंकर महादेवन यांचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत ते म्हणाले, ‘तुम्हाला सांगताना फार आनंद होतोय की मला लवकरच अद्भुत हनुमान चालिसा गाण्याची संधी मिळाली आहे. हे मी ब्रेथलेस स्टाईलमध्येच गाणार आहे. या गाण्याचा गातानाचा वेग फार जास्त आहे. तसेच त्यातील काही शब्द हे कठीण आहे. हनुमान चालिसाचे आपल्या सर्वांच्या आयुष्यात विविध महत्त्व आहे. यामुळे आपल्याला चांगले फायदे मिळतात. त्यामुळे तुम्ही हे नक्की ऐका, असे आवाहनही शंकर महादेवन यांनी केले आहे. शंकर महादेवन यांची ब्रेथलेस हनुमान चालिसा शेमारु भक्ती के यु-ट्यूब चॅनलवर दाखवण्यात येणार आहे.

(हेही वाचा संपकरी एसटी कामगारांच्या हाताला काही लागले नाही!)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.