सर हम्फ्री डेव्ही (Sir Humphrey Davy) यांचा जन्म ग्रेट ब्रिटनमधील पेन्झान्स, कॉर्नवॉल येथे १७ डिसेंबर १७७८ रोजी झाला. डेव्ही यांनी सुरुवातीला औषध विक्रेता म्हणून कामाला सुरुवात केली. सोळाव्या वर्षीच त्यांच्या वडिलांचे निधन झाल्यामुळे त्यांना हे काम पत्करावे लागले. कारन घराची जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली होती.
त्यानंतर स्कॉटिश संशोधक जेम्स वॅट आणि त्यांचा मुलगा ग्रेगरी वॅट हे त्यांच्या घरी राहायला आले. त्यामुळे त्यांच्यावर या संशोधकांचा खूप प्रभाव पडला. तेव्हापासूनच त्यांच्या मनात संशोधनाचे विचार घोळू लागले. त्यांनी डेव्ही लॅम्प आणि आर्क लॅम्पचा शोध लावला. इतर इंधनांचा शोध लागण्यापूर्वी कोळश्याचा वापर इंधन म्हणून केला जायचा. दरम्यान खाण कामगारांची अवस्था खूपच बेताची होती. अनेक लोकांचा दुर्दैवी मृत्यू होऊ लागला.
(हेही वाचा-Ritesh Deshmukh : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा मुलगा झाला विनोदाचा सम्राट)
डेव्ही यांना खाण कामगारांची दया आली. म्हणून त्यांनी ऑक्सिजन शोषून घेणार्या सुरक्षित दिव्याची निर्मिती केली. डेव्ही यांनी बनवलेला दिवा अनेक वर्षे वापरात होता. मात्र इलेक्ट्रिक बल्बचा शोध लागल्यानंतर त्यांचा वापर कमी झाला. मात्र त्यांच्या या शोधामुळे खाण कामगारांचे जीवन सुसह्य बनले.
डेव्ही (Sir Humphrey Davy) यांनी लॉफिंग गॅसवर देखील संशोधन केले होते. या गॅसचा वापर रुग्णांना बेशुद्ध करण्यासाठी केला जायचा. त्यांच्या या महान शोधांमुळे त्यांची किर्ती लंडनमध्ये पसरली.
१८०० मध्ये ते रॉयल इंस्टिट्यूटचे प्राध्यापक झाले. त्यांनी इलेक्ट्रोकेमिस्ट्रीच्या नवीन क्षेत्राचा शोध लावत या विभक्ततेमध्ये सामील असलेल्या शक्तींचा देखील अभ्यास केला. त्यांनी क्लॅथ्रेट हायड्रेट्सचा देखील सर्वात आधी शोध लावला आहे. डेव्ही यांनी अनेक वैज्ञानिक शोध लावून मानवजातीचे जीवन सुसह्य केले आहे.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community