मुंबईतील जे.जे. रुग्णालय परिसरात असणा-या डी.एम.पेटीट नावाच्या साधारण 130 वर्षे जुन्या इमारतीमध्ये एक भुयार सापडले. सदर भाग हा नर्सिंग काॅलेजचा आहे. पण, तिथे सापडलेल्या या भुयारामुळे आता अनेकांची उत्सुकता आणि कुतुहूल शिगेला पोहोचले आहे.
बुधवारी रुग्णालय परिसराची पाहणी करत असताना निवासी वैद्यकिय अधिका-यांना संशयास्पद गोष्टीचा अंदाज आला आहे ज्यानंतर त्यांनी कुतूहलाचा भाग म्हणून तिथे असणारे झाकण काढण्याचा प्रयत्न केला. झाकण निघताच तिथे काहीशी पोकळी असल्याचे त्यांना जाणवले.
( हेही वाचा: कोल्हापुरातील लव्ह जिहाद प्रकरण : मुस्लिम युवकाने हिंदू मुलीला कर्नाटकात नेले )
भुयार साधारण 200 मीटरचे
सुरक्षा रक्षकांच्या सहाय्याने पुढील पाहणी केली आणि तिथे असणा-या भुयाराचा थांगपत्ता लागला. हे भुयार साधारण 200 मीटरचे असून, इमारतीचे आयुर्मान पाहता ते 130 वर्षे जुने असल्याचे सागंण्यात आले आहे. जे जे रुग्णालयाकडून आर्किओलाॅजी डिपार्टमेंटला आणि स्थानिक प्रशासनाला भुयाराबाबत कळवण्यात आले आहे. हे भुयार डिलिव्हरी वाॅर्ड ते चिल्ड्रन वाॅर्डपर्यंत असल्याची माहिती रुग्णालयाच्यावतीने देण्यात आली आहे.
Join Our WhatsApp Community